https://www.facebook.com/1501539223422053/posts/2605646426344655/
पुण्यात या भागाला शिथिलीकरणाचे फायदे
- सिंहगड रस्ता
- औंध, बाणेर
- वारजे, कर्वेनगर
पुणे-महापालिकेने शहराचा सुमारे 80 टक्के भाग सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून रविवारी रात्री जाहीर केला. त्यामुळे तेथे सध्याचीच परिस्थिती कायम राहणार आहे. लॉकडाउनच्या शिथिलीकरणाचे फायदे तेथे मिळणार नाही. मात्र, सिंहगड रस्ता, औंध-बाणेर, वारजे-कर्वेनगर या भागाला शिथिलीकरणाचे फायदे मिळतील. तेथे अत्यावश्यक वस्तू व सेवांशिवाय काही दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात दुकाने सकाळी 10 ते दुपारी 2 तर, त्या बाहेरील क्षेत्रात सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्यान दुकाने खुली राहतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
अशी होणार अंमलबजावणी
- दुकाने सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्यान खुली राहतील
- निवासी भागातील अत्यावश्यक सेवांशिवाय प्रत्येकी पाच दुकाने त्या-त्या भागात सुरू राहणार
- या भागात मद्यविक्रीची दुकाने ठरविक वेळेत काही अटींवर खुली राहतील
- अत्यावश्यक वस्तू ई-कॉमर्सद्वारे घरपोच मिळतील
- बांधकामांना लॉकडाउनच्या शासकीय अटींनुसार परवानगी
- पोलिसांनी परवानगी दिलेल्या दुचाकी आणि मोटारींची वाहतूक करता येईल
- दुचाकीवर एकच तर मोटारीत चालकाशिवाय दोघांना बसता येईल
मायक्रो कंटेन्मेंट झोन
पुणे शहरातील महापालिकेच्या 15 पैकी 12 क्षेत्रीय कार्यालयांच्या अखत्यारितील सुमारे 80 टक्के भाग रविवारी रात्री सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेन्मेंट झोन) म्हणून जाहीर करण्यात आला.
त्याच्या सीमा पोलिस सील करणार असून त्याअंतर्गत जीवनावश्यक वस्तू आणि सेवा ठराविक वेळेत नागरिकांना मिळतील. या भागातून कोणाला बाहेर पडता येणार नाही किंवा आत जाता येणार नाही. लॉकडाऊन शिथिलीकरणाचे फायदे या भागाला मिळणार नाहीत. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या वाहतुकीसाठी पोलिसांच्या पासची गरज नसेल. या भागातील दुकाने सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान, खुली राहणार आहेत
पुण्यातील संक्रमणशील भाग
- कसबा – विश्रामबागवाडा
- भवानी पेठ
- कोंढवा येवलेवाडी
- कोथरूड – बावधन
- ढोले पाटील रोड
- शिवाजीनगर – घोले रोड
- धनकवडी – सहकारनगर
- नगर रोड – वडगाव शेरी
- बिबवेवाडी
- येरवडा, कळस, धानोरी
- वानवडी, रामटेकडी
- हडपसर – मुंढवा