पुणे : खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कविसंमेलनातील कवितांचे संग्रह रुपी जतन करण्यासाठी वारजे साहित्य कट्टा यांनी संपादित केलेल्या “शरदाचे चांदणे” या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते संपन्न झाला.याच कार्यक्रमात कवींचाही सत्कार केला. पुणे महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ आणि माजी नगरसेवक प्रदिप धुमाळ यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
तसेच पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाच्या वतीने महिला बचत गटातील महिलांसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिरातील सहभागी महिलांना प्रमाणपत्र वाटप समारंभ देखील यावेळी पार पडला.
या कार्यक्रमासाठी माझ्यासह महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर , माजी उपमहापौर दिलिप बराटे, दिपाली धुमाळ,प्रदिप धुमाळ, लक्ष्मीताई दुधाने,माजी .नगरसेविका सौ.सायलीताई वांजळे, सोपानकाका चव्हाण, त्रिंबकअण्णा मोकाशी, सचिन दोडके, सुरेशअण्णा गुजर, अनिताताई इंगळे आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.