महिला आयोगाद्वारे 19, 20 व 21 जुलै रोजी जनसुनावणी

Date:

पुणे, दि.13: राज्य महिला आयोगाच्या ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत 19, 20 व 21 जुलै रोजी आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली जनसुनावण्या घेण्यात येणार आहेत.

19 जुलै रोजी पुणे शहरची तर 20 जुलै रोजी पुणे ग्रामीणची जनसुनावणी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जिल्हा नियोजन भवन येथे होणार आहे. दुपारी 3 ते 5 या वेळेत आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवडची जनसुनावणी 21 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, चिंचवड महानगरपालिकेजवळ, पिंपरी येथे होणार आहे. दुपारी 3 ते 5 या वेळेत पिंपरी चिंचवड शहरातील आयोगाच्या विषयाबाबत आढावा घेतला जाणार आहे.

पिडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत व्हावी, कोणतीही पुर्वसूचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहून आपली लेखी समस्या मांडता यावी यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाव्दारे या जनसुनावणीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाच्या प्रशासकीय अधिकारी दीपा ठाकूर यांनी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

 बागेश्वर बाबाचा वक्तव्यांबाबत सारवासारव करत माफीनामा

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या...

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार बायपास, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मेला उद्घाटन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मिसिंग लिंकचा कामाची पाहणी घाटातील...

CM फडणवीसांना लाज वाटली पाहिजे-सपकाळ यांचा प्रहार

मुंबई-धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे...

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मेंदूविकार, अस्थिरोग, कॅन्सरवरील उपचार देण्याचा मानस : प्रकाश आबिटकर

पुणे, दि.२६: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेप्रमाणेच महात्मा...