पुणे :
‘थ्री -डी प्रिंटिंग ‘विषयावर भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या अभियांत्रि की महाविद्यालयात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती . जिओक्लिड थ्री -डी प्रिंटिंग सोल्युशन्स च्या संचालक पूर्वा कुलकर्णी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले .
भारती विद्यापीठ अभिमत अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . आनंद भालेराव अध्यक्षस्थानी होते .
शिक्षण ,संशोधन ,उद्योग क्षेत्रातील ४७ मान्यवर या कार्यशाळेत सहभागी झाले . भारती विद्यापीठाच्या कात्रज कॅम्पस मध्ये ही कार्यशाळा झाली . मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागप्रमुख डॉ . के . बी . सुतार यांनी प्रास्ताविक केले .
पूर्वा कुलकर्णी म्हणाल्या ,’थ्री -डी प्रिंटिंग ला उत्पादन ,औषध निर्मिती ,आर्किटेक्चर,डिझाईन ,कस्टम क्षेत्रात मागणी असून त्याचा वापर सुरु झाला आहे . आगामी काळात या तंत्रज्ञानाला मोठे भवितव्य असून त्याचा अभ्यास अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी केला पाहिजे . ‘
डॉ . आनंद भालेराव म्हणाले ,’शिक्षण,तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रात मोठे बदल घडत असून या बदलाचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे . थ्री -डी तंत्रज्ञान मानवी जीवनात उपयोगी ठरण्यासाठी संशोधन आणि प्रयत्नांची आवश्यकता आहे .भारती विद्यापीठात आम्ही विद्यार्थ्यांना जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि बदलांसाठी प्रशिक्षित करणारे उपक्रम जाणीवपूर्वक करीत आहोत ‘