पुण्यात अ.भा. मुस्लिम मराठी साहित्य संमेलन

Date:

पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आणि मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या वतीने मुस्लिम मराठी साहित्य चळवळीचे १२ वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन ४ ते ६ जानेवारी दरम्यान पुणे येथे होणार आहे . संमेलनाचे उदघाटन ज्येष्ठ विचारवंत  डॉ आ ह साळुंखे  यांच्या हस्ते ४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता आझम कॅम्पस येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती  स्वागताध्यक्ष  तसेच , महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ . पी ए इनामदार यांनी दिली .
प्रा . डॉ . अलीम वकील हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असून संमेलन स्थळाला प्रा . फक्रुद्दीन बेन्नूर साहित्यनगरी नाव देण्यात आले आहे . आझम कॅम्पस (पुणे) येथे मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाचे  अध्यक्ष   डॉ . शेख इकबाल मिन्ने यांच्या  अध्यक्षत्याखालील संयोजन समितीने तयारी पूर्ण  केली आहे .
महाराष्ट्रातील मुस्लिमांची बोलीभाषा दखनी असली तरी त्यांची व्यवहाराची आणि  अभिव्यक्त होण्याची भाषा मराठी आहे . मुस्लिम मराठी साहित्य चळवळ ही महाराष्ट्रातील मुस्लिमांनी मराठीत अभिव्यक्त व्हावे यासाठी २८ वर्षांपासून प्रयत्न करीत आहे . २३ वर्षांनी पुण्यात हे साहित्य संमेलन  पुन्हा होण्याचा योग्य जुळून आला असून आझम कॅम्पस (पुणे कॅम्प )येथे हे साहित्य संमेलन होत  आहे . या चळवळीची साहित्य संमेलने सोलापूर ,नागपूर ,रत्नागिरी ,नासिक ,जळगाव ,कोल्हापूर ,औरंगाबाद ,पनवेल ,नवी मुंबई,मुंबई ,पुणे  येथे झाली आहेत .
उदघाटन सोहळ्याला पालकमंत्री गिरीश बापट ,महापौर मुक्ता टिळक ,डॉ . विश्वनाथ कराड ,निवृत्त व्हाईस  एडमिरल निजाम नदाफ ,डॉ . जहीर काझी ,प्रा . फ  म शहाजिंदे  ,विलास सोनावणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत .
४ जानेवारी दुपारी अडीच वाजता ‘महाराष्ट्रातील बोलीभाषा आणि मुस्लिम मराठी साहित्य ‘ या विषयावर  परिसंवाद आयोजित केला आहे . त्यात डॉ  मुहम्मद आझम ,डॉ  आनंद काटीकर ,डॉ  प्रतिमा इंगोले , गुलाम ताहेर शेख ,डॉ  रज्जाक कासार आदी सहभागी होणार आहेत .
सायंकाळी साडेचार वाजता ‘राष्ट्रवाद कोणाची मिरासदारी ‘या विषयावर  परिसंवाद आयोजित केला आहे . त्यात  डॉ  कुमार सप्तर्षी ,डॉ  अब्दुल कादर  मुकादम ,प्रा  जावेद कुरेशी ,प्रा  रहमतुल्ला कादरी ,डॉ  भालचंद्र कांगो ,श्रीमंत कोकाटे , साहिल शेख सहभागी होणार आहेत . रात्री ८ वाजता ‘म्यूट ‘ ही एकांकिका सादर होईल .
४ जानेवारी रात्री ९ वाजता  कवी संमेलन आयोजित करण्यात आले असून त्यात प्रा फ म शहाजिंदे ,सय्यद अल्लाउद्दीन ,डॉ  सुभाष माने ,डॉ रफिक सुरज ,दुर्गेश सोनार ,बादशाह सय्यद ,आरती धारप आदिंचा समावेश आहे .
५ जानेवारी शनिवारी सकाळी ९ वाजता ‘ सोशल मीडिया आणि नवलेखनाची परंपरा   ‘ या विषयावर  परिसंवाद आयोजित केला आहे . त्यात   प्रा फातिमा मुजावर ,डॉ मोईनुद्दीन मुतवल्ली , कलीम अजीज ,डॉ समाधान इंगळे ,राम जगताप ,हीना कौसर खान         दाहर मुजावर आदी सहभागी होणार आहेत .
सकाळी ११ वाजता ‘मुस्लिम तरुणापुढील आव्हाने  ‘या विषयावर  परिसंवाद आयोजित केला आहे . त्यात  डॉ एस एन पठाण ,गणी  आजरेकर ,चंद्रशेखर शिखरे ,डॉ फारुख  तांबोळी ,हलीमा कुरेशी ,अझीम शेख आदी  सहभागी होणार आहेत .
दुपारी दीड वाजता ‘प्रसारमाध्यमे  आणि  मुसलमान ‘  या विषयावर  परिसंवाद आयोजित केला आहे . त्यात  डॉ  जयदेव डोळे ,संजय आवटे , आमदार इम्तियाझ जलील ,बशीर मुजावर ,राज काझी ,अझीम शेख ,साजिद पठाण आदी  सहभागी होणार आहेत .
सायंकाळी ४ वाजता ‘ धार्मिक ध्रुवीकरण आणि  समतेच्या चळवळी  ‘ या विषयावर  परिसंवाद आयोजित केला आहे . त्यात  डॉ  रत्नाकर महाजन ,अन्वर राजन ,डॉ  बशरत अहमद ,निरंजन टकले ,डॉ सय्यद रफिक पारनेरकर , ह भ प डॉ  सुहास  फडतरे महाराज ,डॉ सुदाम राठोड आदी  सहभागी होणार आहेत .
सायंकाळी ७ वाजता ‘अनुवंशिक गैरसमज ‘ ही एकांकिका सादर होईल . रात्री साडेसात वाजता ‘मुस्लिम यशस्वी उद्योजकांशी संवाद ‘ हा कार्यक्रम आयोजित केला आहे . तर रात्री ९ वाजता ‘मिला जुला मुशायरा ‘  होईल .
६ जानेवारी (रविवारी ) सकाळी ९ वाजता कविसंमेलन होणार आहे . सकाळी ११ वाजता ‘मुस्लिम मराठी साहित्याचे सामाजिक योगदान  ‘या विषयावर  परिसंवाद आयोजित केला आहे . त्यात  फ म  शहाजिंदे ,डॉ विद्या बोरसे ,डॉ  विश्वास वसेकर ,डॉ  अक्रम पठाण ,डॉ   पांडुरंग कंद आदी  सहभागी होणार आहेत .
दुपारी दीड वाजता मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाची सर्वसाधारण सभा होणार असून खुले संमेलन होईल . दुपारी अडीच वाजता ‘इस्लाम आणि स्त्रियांचे हक्क ‘ हा परिसंवाद होईल . त्यात डॉ कादिरा शेख ,आबेदा इनामदार ,डॉ आयेशा पठाण ,सीमा देशपांडे, शरीफा बाले सहभागी होणार आहेत .
सायंकाळी साडेचार वाजता या तीन दिवसीय संमेलनाचा समारोप होणार असून  माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे ,सामाजिक  न्याय मंत्री दिलीप कांबळे ,उपस्थित राहणार आहेत .

संमेलन यशस्वी करण्यासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून त्यात डॉ . शेख इकबाल मिन्ने ,प्रा . लियाकत अली पटेल ,अन्वर जावेद शेख , डॉ . बशरत अहमद ,प्रा . आरिफ शेख ,युनूस आलम सिद्दीकी ,साजिद पठाण ,ए के शेख ,विलास सोनावणे ,इम्तियाझ शेख ,महमूद काझी ,अब्दुल अझीम शेख ,बशीर मिन्ने ,कलीम अझीझ ,दहार मुजावर ,डॉ केतकी भोसले ,अब्दुल लतीफ मगदूम ,नूरजहाँ शेख ,शहाजहान मगदूम ,डॉ पांडुरंग कंद ,कौसर मुजावर ,आय के शेख यांचा समावेश आहे .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धनाबाबत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

पुणे, दि. १८: बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण...

खऱ्या भारताचा शोध घेण्यासाठी उघड्या डोळ्यांनी सामाजिक वास्तव पहा -पद्मश्री गिरीश प्रभुणे

पुणे,:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरचा सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचा...