पी.ए.इनामदार कॉलेज ऑफ ‘वेदा’च्या वतीने आयोजन
पुणे : ‘पी.ए.इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स, डिझाईन अॅण्ड आर्ट्स’, आझम कॅम्पसच्या वतीने ‘एनडी फिल्म वर्ल्ड’ भेट दौऱ्याचे आयोजन केले होते.
‘बीएससी मीडिया ग्राफिक आणि ऍनिमेशन’च्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम होता.
‘एनडी फिल्म वर्ल्ड’ हे एक उत्तम वास्तुशिल्पकाराचे अतिशय सुंदर उदाहरण आहे. भारतीय सिनेमाच्या इतिहासासंदर्भात माहिती देणे आणि त्याची प्रक्रिया जाणून घेणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता’, असे ‘वेदा’ महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषी आचार्य यांनी सांगितले.
भेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी दिग्दर्शक नीतीन देसाई यांच्याकडून ‘टाऊन स्क्वेअर सेट’, अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित हॉरर मूव्ही, हॉरर सीरियल, शूटिंगसाठी बनविलेले एक अनोखे घर, संत विठ्ठलाची विशाल संरचना याविषयी माहिती घेतली. तसेच हिंदी सिनेमाचे मूल्य समजून घेतले, असे या उपक्रमाचे आयोजक स्वतंत्र जैन यांनी सांगितले.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्टोरी बोर्ड, आर्ट आणि डिझाईन्स, ठिकाणाची निवड, पटकथा, रिअल टाइम नाटक आणि अभिनय, ध्वनी प्रणाली, प्रकाशाची परिणामकारकता, स्टेज व्यवस्था या बाबतचे ज्ञान आत्मसाद केले.