…तर शरद पवार होऊ शकतील पंतप्रधान ..

Date:

नवीदिल्ली(विशेष प्रतिनिधी )- महाराष्ट्रात 24 /24 जागांवर आघाडी करणाऱ्या राष्ट्रवादी काँगेसच्या शरद पवारांची इच्छया आणि स्वप्न पंतप्रधान होण्याचे आहे.. हे कॉंग्रेसचे पक्ष श्रेष्ठी जाणून आहेत . मात्र त्यासाठी शरद पवारांनी आपला राष्ट्रवादी पक्ष कॉंग्रेस मध्ये पुन्हा विलीन केला पाहिजे असे मत आज दिल्लीतील एका खाजगी बैठकीत  खुद्द राष्ट्रवादी च्याच एका नेत्याने कॉंग्रेसच्या मुख्य पदाधिकाऱ्यांपुढे केल्याने आता हा विषय कॉंग्रेसच्या सोनिया आणि राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचणार काय ? असा प्रश्न दिल्लीतील राजकीय वर्तुळात आज रात्री उशिरा विचारला जात होता .तथापि महाराष्ट्रातील जागावाटपाचे बहुतांशी हक्क पवारांना देणे अशी अट राष्ट्रवादी ची होती मात्र त्यात अवघ्या १८ जागा कॉंग्रेस पक्षश्रेष्ठी सांगतील तशा देता येऊ शकतील अशा अटींचा विलीनीकरण मुद्द्यात  समावेश होता .
आज रात्री नवी दिल्लीतील एका हॉटेल मध्ये राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या काही बड्या हस्तींची एक खाजगी पार्टी झाल्याचे वृत्त ‘मायमराठी ‘च्या हाती आले आहे. खरे तर या  पार्टीचे आयोजन  … एका महिला खासदाराने केले होते मात्र त्याच या पार्टीला उपस्थित नव्हत्या .मात्र कॉंग्रेसच्या एका जुन्या महिला कार्यकर्तीने दिलेल्या माहिती नुसार या पार्टीला अवघे 6 नेते उपस्थित होते .आणि यावेळी आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाली . महाराष्ट्र  सदन पासून अवघ्या 20 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका हॉटेलात हि बैठक झाली .महाराष्ट्रात शरद पवार जर 24 /24 जागांचा फॉरमुला वापरून निवडणुका लढवीत आहेत तर त्यांनी राष्ट्रवादी पूर्णतः कॉंग्रेस मध्ये विलीन करून महाराष्ट्राचे तात्पुरते नेतृत्व हाथी घ्यावे.आणि स्वतःला योग्य वाटतील त्याप्रमाणे जागावाटप करून किमान 35 जागा निवडून येतील याची हमी घ्यावी .जर नरसिंह राव , मनमोहन सिंह यांना कॉंग्रेस पंतप्रधान करू शकते तर शरद पवारांना देखील करू शकते .मात्र त्या साठी जागा वाटप स्वातंत्र्य त्यांना देवून 35 जागांची हमी द्यावी लागेल.महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांपासून देखील या बैठकीची  गुप्तता पाळण्यात आली या साठी राष्ट्रवादीच्या एका महिला खासदाराने महत्वाची भूमिका निभावली .हि बैठक रात्री उशिरा दीड वाजेपर्यंत सुरूच होती .कॉंग्रेस ला एक हाती बहुमत मिळाल्याशिवाय गांधी घराण्याचा कोणी हि पंतप्रधान होणार नाही हे यावेळी विशेष म्हणजे नमूद केले गेले . त्यामुळे जर विविध पक्षांचे कॉंग्रस पुरस्कृत सरकार आले तर शरद पवार पंतप्रधान होण्यासाठी हि संधी असल्याचेच यातून सुचविण्यात आल्याचे दिसते आहे .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भाजप राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारने धडक

पुणे-पुण्यात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या...

पुणे–मुंबई एक्सप्रेसवेवर तब्बल 15 तास वाहतूक ठप्प:1 गॅस टँकर पलटी

मुंबई–पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस...

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारापूर्वी पुण्याच्या Golden King ला मागितली होती 5 कोटीची खंडणी

शेट्टी गोळीबार ;सर्व आरोपी पुण्याचे रहिवासी, कुणी विद्यार्थी, तर...