पुणे (प्रतिनिधी)
पुणे शहरात कोरोनाचे रूग्न आढळल्याचे समोर आल्यानंतर पुणे महापौर चषक क्रीडा स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेला नागरिकांची आणि क्रीडा प्रेमींची मोठी गर्दी होत असते, त्यामुळे कोणताही धोका निर्माण होऊ नये, म्हणून हा निर्णय घेतल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.
महापौर मोहोळ म्हणाले, या चषक अंतर्गत यंदा ३६ क्रीडा प्रकारांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येत होती. त्यातील साधारण निम्म्या क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा पूर्ण झालेल्या आहेत. मात्र उरलेल्या स्पर्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आल्या आहेत. नजीकच्या काळात या स्पर्धा घेण्याचा विचार आहे’.