या वर्षी देखील पाणीपट्टीत 15 टक्के दरवाढ महापालिकेच्या मुख्य सभेत मंजूर

Date:

पुणे – पुणेकरांना 24 तास शुध्द पाणी पुरविण्याकरिता आखलेल्या योजनेतर्गंत या वर्षी देखील पाणीपट्टीत 15 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी मंजूर झाला. ही वाढ पुढील आर्थिक वर्षापासून लागू होईल. नव्या निर्णयानुसार पुणेकरांना वर्षाकाठी दीड ते चार हजार रुपये मोजावे लागणार आहेत. दुसरीकडे, लोकांना रोज अपुरे पाणी मिळत आहेत, 24 तास पाणीपुरवठा योजनेला गती नसल्याने पाणीपट्टीत वाढ करू नये, असा आग्रह सदस्यांनी धरला

पाणीपुरवठा योजनेसाठी मागील वर्षापासून पाच टप्प्यांत पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय महापालिकेने 2016 मध्ये घेतला आहे. त्यानुसार पहिल्या वर्षी 12 टक्के, पुढील चार वर्षे प्रत्येकी 15 टक्के वाढ करण्यात येणार आहे.

पाणी पट्टीत अडीचशे ते पावणेतीनशे रुपयांनी, तर बिगर निवासी मिळकतींमध्ये पाचशे रुपयांनी वाढ होणार आहे.
महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी २०२०-२१ च्या अर्थसंकल्पीय आराखड्यात मिळकतकरात १२ टक्के, तर पाणीपट्टीत १५ टक्के वाढ सुचविली होती. स्थायी समितीने मिळकतकरातील वाढ फेटाळून लावली होती; पण 24   पाणीपुरवठा योजनेसाठी पाणीपट्टीत वाढ करण्यास मंजुरी दिली होती. सर्वसाधारण सभेने त्यावर मोहोर उमटविल्याने पुणेकरांच्या करात वाढ होणार नसली, तरी आगामी वर्षाच्या बिलांमध्ये पाणीपट्टीत वाढ होणारच आहे.  महापालिकेच्या मंगळवारच्या सभेत पाणीपट्टीत वाढ करण्याच्या निर्णयाला विरोधकांनी आक्षेप घेतला. शहरात अजूनही अनेक भागांत पुरेसे पाणी मिळत नसताना पुणेकरांवर लादलेली ही अन्यायकारक वाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांनी केली; तसेच पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील पाणीपट्टी वाढ तूर्तास स्थगित ठेवण्यात यावी, असेही सुचविण्यात आले. पाणीपट्टीची थकबाकी मोठी असल्याने ती वसूल करण्याकडे कटाक्षाने लक्ष दिले जावे, असा आग्रह सदस्यांनी धरला. शहरातील पाणीपट्टीत वाढ होत असताना, शहराच्या अनेक भागांत पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याचे गाऱ्हाणे मांडण्यात आले.

पाणीपट्टी…

करपात्र रक्कम  -२०१९-२० ची पाणीपट्टी -२०२०-२१ ची पाणीपट्टी

०००१ ते १,०००  ~ १,५३३ ~  १,७६३

१,००१ ते ३,००० ~  १,७०३ ~  १,९५८

३,००१ ते ५,००० ~  १,८७५ ~  २,१५६

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे म्हाळुंगे स्विचिंग उपकेंद्राला मिळणारा वीजपुरवठा विस्कळीत; दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

पुणे : एका अज्ञात वाहनाने मंगळवारी (दि. २१) दुपारी ५ वाजेच्या सुमारास धडक दिल्याने ४०० केव्ही कुरुळी अतिउच्च दाब उपकेंद्रातून निघणाऱ्या २२ केव्ही म्हाळुंगे स्विचिंग इनकमर आणि २२ केव्ही एमआयडीसी डबल सर्किट फीडरला आज (दि. २१) फटका बसला आहे. वाहनाच्या...

ख्रिश्चन समाजातील उद्योजक व व्यावसायिकांच्या संस्थेची पुण्यात होतेय स्थापना

पुणे- शहरातील अल्पसंख्यांक व ख्रिश्चन समाजातील उद्योजक व व्यापारी...

अध्यक्षपदाची गाडी नाकारून बचतीचा निधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्याचा बाप्पू मानकर यांचा निर्णय

विश्रामबाग वाडा प्रभाग समिती अध्यक्षपदी राघवेंद्र (बाप्पू) मानकर बिनविरोध.. पुणे:...

रेल्वेकडून उन्हाळी सुटीच्या तीन महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण देशात 18262 उन्हाळी विशेष रेल्वे फेऱ्या

गर्दीच्या हंगामात प्रवाशांना दिलासा देण्यासाठी 11294 फेऱ्यांची आधीच घोषणामध्य...