पुणे-स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत चुकीचे वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत आज महापालिकेतील भाजपने राहुल गांधी यांचा निषेध करणारी तहकुबी बहुमताने संमत केली .एकीकडून माफिवीर तर दुसरीकडून स्वातंत्र्यवीर अशा घोषणा सभागृहात होत होत्या .तहकुबी वर मतदान घेण्यात आले तेव्हा निषेधाच्या बाजूने भाजपच्या सर्व सभासदांनी मतदान केले तर कॉंग्रेस आणि राष्ट्रावादी च्या सभासदांनी विरोधात मतदान केले . शिवसेना आणि मनसे यांनी तटस्थ भूमिका घेतली . या तहकूबीवर आम्हाला बोलायचे आहे असे यावेळी कॉंग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी वारंवार मागणी केली मात्र महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्याकडे दुर्लक्ष करत सभा तहकूब केली .
https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/2409195682727232/