लखनऊ – उत्तर प्रदेशच्या एका कोर्टातच गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली आहे. बिजनौर येथील स्थानिक न्यायालयात सुनावणी सुरू होती. आरोपीला दुपारी कोर्टरुमध्ये सादर करण्यात आले. त्याचवेळी आरोपीला गोळ्या झाडून ठार मारण्यात आले आहे. अचानक झालेल्या या गोळीबारात कोर्टात अचानक गोंधळ उडाला आणि न्यायाधीशांवर सुद्धा आपला जीव वाचवण्याची वेळ आली होती. या गोळीबारात तीन जणांचा हात होता. ते सगळेच पळून जाण्याच्या तयारीत होते. परंतु, पोलिसांनी कोर्टरुमला घेराव टाकून बाहेर जाण्याचे मार्ग बंद केले. तसेच आरोपींना अटक केली.
मुंबईतून अटक करण्यात आला होता आरोपी…
मीडिया रिपोर्टनुसार, याच वर्षी 28 मे रोजी बिजनौरच्या एका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये प्रॉपर्टी डीलर हाजी अहसान आणि त्यांच्या भाच्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यातील आरोपी दानिशला पोलिसांनी मुंबईतून तर जब्बार आणि शाहनवाजला दिल्लीतून अटक केली होती. जब्बार आणि शाहनवाजला मंगळवारी कोर्टात आणण्यात आले. त्यावेळी शार्पशूटर आधीच कोर्टात होते. त्यांनी बेछूट गोळीबार केला आणि एकच गोंधळ उडाला.
2 पोलिसही जखमी, एक आरोपी कोर्टातून फरार
पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हाजी अहसानच्या मुलाने आणि इतर आरोपींनी हा हल्ला केला होता. यात शाहनवाजचा जागीच मृत्यू झाला. तर जब्बार घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेत दोन पोलिस सुद्धा जखमी आहेत.