पुणे-सार्वजनिक गणेशोत्सवा निमित्त आज पुण्याचे ग्रामदैवत असणाऱ्या कसबा गणपतीची आरती 126कलाकारांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यंदाचा गणेशोत्सव शांततेत ,निर्विघ्नपणे आणि सुरक्षितपणे पार पडावा म्हणून या कलावंताकडून कसबा गणपतीला साकडे घालण्यात आले.
यावेळी पालकमंत्री गिरीष बापट, महापौर मुक्ता टिळक. स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ. पालिका आयुक्त कुणाल कुमार तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेते रवींद्र मंकणी राहुल सोलापूरकर मोहनकुमार भंडारी ,प्रवीण तरडे ,ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी,जयमाला काळे,अभिनेत्री पूजा पवार ,जादुगार विजय रघुवीर ,महेश टिळेकर ,बंडा जोशी,वंदन नगरकर ,निकिता ओंबासे ,नीता दोंदे,मयूर लोणकर ,वैभव पगारे,राहुल लोहगावकर,विजय कोटस्थाने,योगेश वणवे,सुवदन आंग्रे ,कुणाल निंबाळकर ,प्रशांत बोगम ,शास्त्रीय गायक आनंद भाटे, कीर्ती गायकवाड, हरी आंबेकर, कल्याण गायकवाड, सुनील गोडबोले, राधा कुलकर्णी, राहुल बेलापूरकर,सचिन शिंदे ,प्रीती व्हिक्टर ,शार्दुल लिहिणे ,मयुरेश जोशी ,विनोद सातव ,सुनंदा काळूस्कर ,सुबोध चांदवडकर,शेखर गरुड,माणिक बजाज तसेच जुने – नवे कलाकार यावेळी उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज भोसले ,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद -पुणे अध्यक्ष सुरेश देशमुख यांच्यासह ,बालगंधर्व परिवार, लोककला -लावणी निर्माता व कलावंत संघ, नाट्य निर्माता संघ, ऑर्केस्ट्रा निर्माता संघ, रंग भूमी सेवक संघ ,नृत्य परिषद , साउंड लाईट जनरेटर असोसिशन आदी संस्था या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.