Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महिलांच्या विषयीच्या अनेक प्रश्नावर उत्तर म्हणून मार्गदर्शन करणारे ‘वुमन बिईंग’ पुस्तकाचे प्रकाशन

Date:

सौ. स्मिता कसमळकर लिखित ‘वुमन बिईंग’ पुस्तकाचे प्रकाशन

प्रत्येक क्षेत्रातील लोकांनी लिखाण करावे; आयुक्त शेखर गायकवाड

पुणे (प्रतिनिधी) : प्रत्येक क्षेत्रातील लोकांनी लिखाण करायला हवे. अनेक वेळा दर्जा असलेले व्यक्ती लिहत किंवा बोलत नसल्याने दर्जा नसलेल्या माणसांच ऐकावं तथा वाचाव लागते. महिलांच्या विषयावर कितीही लिखाण केल तरी ते कमीच पडेल इतके प्रश्न महिलांचे असतात. आयुष्य जगत असतांना कस राहव, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, महिलांचे आरोग्य, शारिरीक व मानसिक दृष्ट्या कस असावे इत्यादी आवश्यक गोष्टींचा अभ्यासपूर्ण समावेश मोजक्या शब्दात सांगायचा उत्तम प्रयत्न लेखीका सौ. स्मिता कसमळकर यांनी ‘वुमन बिईंग’ या पुस्तकात केला आहे. त्यांचे मी अभिनंदन व कौतुक करतो; असे प्रतिपादन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले.

महिलांच्या विषयीच्या अनेक लहान – मोठ्या प्रश्नावर उत्तर म्हणून सल्ला तसेच मार्गदर्शन करण्यासाठी उपयुक्त असणारे ‘वुमन बिईंग’ या सौ. स्मिता कसमळकर यांच्या द्वारे लिखित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी आयुक्त गायकवाड बोलत होते. यावेळी व्यवसाय मार्गदर्शक श्रीकृष्ण सावंत, पुला संचालिका सोनिया कोंजेती आपला आवाज, आपली सखीच्या संगीता तरडे, सचिन कसमळकर आदि मान्यवर तसेच कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार व वाचक उपस्थित होते.

लेखिका स्मिता कसमळकर म्हणाल्या, हे पुस्तक वीस वर्षांचा अनुभव व दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर तैयार झाले आहे. या पुस्तकात महिलांच्या बाबतीत असलेल्या अनेक विषयांवर मंथन करून लिहण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे; तुम्हाला तो नक्की आवडेल. खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण सारख्या अनेकांनी या पुस्तकाचे कौतुक केले त्याबद्दल कसमळकर यांनी आभार मानले व प्रत्येक महिलेला हे पुस्तक वाचण्यासाठी आवाहन केले.

व्यवसाय मार्गदर्शक एस. एस. सावंत म्हणाले, एका महिलेकडे अनेक कौशल्य असतात मात्र त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. घरात आर्थिक दृष्ट्या हातभार लावण्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन जगाला आपली ओळख करून दिली पाहिजे. आज स्मिता कसमळकर यांचा प्रवास पाहून प्रत्येकाला अभिमान वाटतो. त्यांचे अभिनंदन व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तुळजाभवानी मंदिराच्या मद्यधुंद‎ पुजाऱ्याची कार्यालयात तोडफोड‎, गैरवर्तनप्रकरणी 3 महिने मंदिरात प्रवेशाला बंदी‎

तुळजापूर‎-तुळजाभवानी मंदिर कार्यालयात मद्यधुंद‎अवस्थेत सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ करत‎पुजाऱ्याने तोडफोड...

शरद पवार यांचा पक्ष मूळ पक्ष आहे. ते अजित पवार यांच्या गटात कशासाठी जातील?-खासदार संजय राऊत

अजित पवार हे शरद पवार यांच्या पक्षाला त्यांच्या गटामध्ये...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका:फेर प्रभाग रचना करा-निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला निर्देश

लोकशाहीच्या मूळ तत्वांचा अवमान-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर न...