पुणे- महापालिकेत ‘माय मराठी’ ने बोगस कामगार मिळकत कर विभागात रंगे हाथ पकडून दिल्यावर देखील अनेक बोगस कामगारांना पाठीशी घालणाऱ्या महापालिकेने चक्क तरुणाई ला नौकरीच्या आशेला लावून त्यांच्याकडून वेठबिगारी करून घेतल्याचे स्पष्ट झाले.या प्रकाराची ना सत्ताधाऱ्यांनी दखल घेतली ना प्रशासनाने…अजूनही असंख्य सुरक्षा रक्षकांचे तर कधी महिला कामगारांचे पगार वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी वारंवार येत असतात.उत्पन्नाची भरारी,पारितोषिकांची खैरात ज्या महापालिकेवर होत आली तिथे कामगारांची हि अवस्था मात्र कोणाला कशी दिसली नाही कोण जाणो ? आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांनी तर वैकुठांत काम करणाऱ्या कामगारांचे पगार देखील वेळेवर होत नसल्याचा मुद्दा थेट सोशल मीडियात मांडला आहे.येथे आवश्यकतेपेक्षा कमी कामगार ठेवणे,ठेकेदारी पद्धतीवर ठेवणे,आहेत त्या कामगारांना वेळेवर पगार न देणे, त्यांच्या पीएफ आणि इ एस आय च्या रकमेत तफावती आढळणे असे मुद्दे त्यांनी चव्हाट्यावर मांडले आहेत. उत्पन्नाची भरारी घेत स्मार्ट पुणे बनविणाऱ्या महापालिकेने सामान्य कामगारांना असे आर्थिक छळणे बरोबर आहे काय ? असे प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत.खाबियांना जे दिसले किंवा दिसते ते महापालिका प्रशासनाला दिसत नाही काय ? महापालिका मिळकत कर विभागात माय मराठी ने रंगे हाथ पकडून दिल्यावर त्या बोगस कामगारावर कारवाई तर प्रशासनाने केली.पण त्यामागे दडलेल्या हस्तींना मात्र रान उपलब्धी ठेवायची ती तशीच ठेवली.प्रशासक बनलेले आयुक्त आता तरी याकडे लक्ष देतील काय ? असाही प्रश्न आता उपस्थित होणार आहे.
अरेरे…वैकुंठातील कामगारांवर देखील अन्याय..कामगार कायद्यांची पायमल्ली
Date:

