विलास चाफेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त वंचित विकासतर्फे रविवारी (दि.२४) सामाजिक परिषद

Date:

पुणे : वंचित विकास संस्थेच्या वतीने स्वर्गीय विलास चाफेकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त एकदिवसीय सामाजिक परिषदेचे आयोजन केले आहे. विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना आमंत्रित करून विचारांची व अनुभवांची देवाणघेवाण व्हावी, हा या सामाजिक परिषदेच्या आयोजनामागे उद्देश आहे. ही सामाजिक परिषद रविवार, दि. २४ जुलै २०२२ रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत कर्वे रस्त्यावरील अश्वमेध सभागृहात होणार आहे, अशी माहिती वंचित विकास संस्थेचे कार्यकारिणी सदस्य डॉ. श्रीकांत गबाले, देवयानी गोंगले व मीनाक्षी नवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. श्रीकांत गबाले म्हणाले, “या सामाजिक परिषदेची सांगता चाफेकर सरांच्या आठवणी सांगणारे ‘प्रिय सर’, सामाजिक कार्यासाठी मार्गदर्शक अशा पाच पुस्तिकांचा संच ‘पाया समाजकार्याचा’ आणि बलात्कारासारख्या नाजूक व ज्वलंत विषयावर सरांनी लिहिलेल्या ‘बलात्कार : एक समस्या’ या तीन पुस्तकांच्या प्रकाशनाने होणार आहे. प्रकाशन सोहळा सायंकाळी ५ वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू दांडेकर, प्रतिभा गुंडी व आनंद सराफ यांच्या हस्ते होणार आहे.”
मीनाक्षी नवले म्हणाल्या, “सामाजिक कार्य आणि कायदा यावर ॲड. शिवराज कदम जहागीरदार, ट्रायबल मेन्सा नर्चरिंग प्रोग्रामवर डॉ. नारायण देसाई, सजग नागरिक मंचाविषयी विवेक वेलणकर, फॅमिली प्लॅनिंग ऑफ इंडियाविषयी ॲड. अवलोकिता माने, जीवित नदी विषयी शैलेजा देशपांडे, बालरंजन केंद्र मुलांच्या अधिकाराविषयी माधुरी सहस्रबुद्धे, सामाजिक संस्था आणि फंडिंग एजन्सी यांच्यातील संवाद यावर मंजुषा दोषी, संस्कार संजीवनी फाउंडेशनविषयी परमेश्वर काळे, परिवर्तन बहुद्देशीय सेवाभावी संस्थेविषयी धनराज बिराजदार, इन्स्टिट्यूट ऑफ स्टडी ऍब्रॉड विषयी उत्तरा जाधव आणि शासन व सामाजिक संस्था यावर वैशाली नवले या सामाजिक परिषदेत आपले विचार मांडणार आहेत.”
देवयानी गोंगले म्हणाल्या, “सामाजिक कार्यात भरीव योगदान देत असलेल्या संस्था व व्यक्ती या परिषदेत सहभागी होत असून, सामाजिक कार्याविषयी विचारमंथन होणार आहे. ही परिषद सर्वांसाठी विनामूल्य असून, सहभागासाठी नोंदणी आवश्यक आहे. https://forms.gle/V8ErTk6AppNWSRkv7 या लिंकवर नोंदणी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी मीनाक्षी नवले (७०३०८३३८००) किंवा डॉ. श्रीकांत गबाले (९९२३५५८५३९) यावर संपर्क साधावा.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोलंबो परिषदेसाठी काँग्रेसचे नगरसेवक सुनील शिंदे यांची निवड!

पुणे- महापालिकेतील कॉंग्रेसचे नगरसेवक आणि कामगार नेते सुनील...

राज्यात 1 ते 15 मे 2026 या कालावधीत स्व-गणना, तर घरोघरी जाऊन घरांची यादी आणि गृहगणना 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान होणार

मुंबई, महाराष्ट्र जनगणना संचालन संचालनालयाने आज मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन...

येरवड्यातील लुंबिनी उद्यानात भीमगीतांची ‘धम्म संध्या’ उत्साहात संपन्न

बुद्ध जयंतीनिमित्त माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका नंदिनी...

परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय

जिल्हा परिषद सेवकांची सहकारी पतसंस्था:चेअरमन पदासाठी प्रदीप गोलांडे आणि...