थकबाकी वसुली साठी स्थायी समिती अध्यक्षांचे प्रधान सचिवांना पत्र
राज्य सरकारने मुद्रांक शुल्कापोटी २५० कोटी रूपयांची थकबाकी तातडीने देण्याची मागणी
पुणे-राज्य सरकार कडे थकीत असलेली मुद्रांक शुल्क अधिभारापोटी ची १ टक्का रक्कम पुणे महापालिकेला त्वरित अदा करण्यात यावी असे पत्र आज महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिले आहे. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना हे पत्र रासने यांनी पाठविले आहे. कोरोना च्या काळात महापालिकेला आर्थिक भार सोसावा लागत असून अशा काळात तरी थकबाकी तातडीने प्राप्त व्हाव्ही अशी विनंती या पत्रातून करण्यात आली आहे.