स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: 16वर्षाखालील मुले:
करीम खान(महाराष्ट्र)वि.वि.जितीन छेत्री(चंदीगढ) 6-0, 6-1;
शिवम कदम(महाराष्ट्र)वि.वि.कृतांत शर्मा(आसाम) 6-4, 6-4;
यशराज दळवी(महाराष्ट्र)(14)वि.वि.अनंत मुनी(आंध्रप्रदेश) 6-4, 6-4;
करण सिंग(हरियाणा)(9)वि.वि.अपूर्णवा मजुमदार(पश्चिम बंगाल) 3-6, 6-3, 6-0;
मोनील लोटलीकर(कर्नाटक)वि.वि.ज्ञानग्
बुषण हॊबम(मणिपूर)वि.वि.आयुष भट(कर्नाटक)(7) 4-6, 6-0, 6-2;
अर्जुन गोहड(महाराष्ट्र)वि.वि.धन्या शहा(गुजरात)(13) 1-6, 6-2, 6-1;
साहेब सोधी(महाराष्ट्र)वि.वि.अर्जुन कुंडू(गुजरात)(6) 7-6(5), 4-6, 7-6(3);
कृष्णन हुडा(चंदीगड)(5)वि.वि.नीरव शेट्टी(महाराष्ट्र) 6-2, 6-2;
डेनिम यादव(मध्यप्रदेश)(3)वि.वि.आदित्
हिरक वोरा(गुजरात)(8)वि.वि.फरहान पत्रावाला(गुजरात) 2-6, 6-1, 6-2;
दक्ष अगरवाल(महाराष्ट्र)वि.वि.वंश नांदल(हरियाणा) 6-4, 6-0;
अनर्घ गांगुली(महाराष्ट्र)वि.वि.अंश कुंडू(हरियाणा) 6-2, 6-0;
चिराग दुहान(हरियाणा)(2)वि.वि.जस्मित दुहान(हरियाणा) 6-0, 6-1.
राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत साहेब सोधी, अर्जुन गोहड, बूषन होबम यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का
मुंबई: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया यांच्या तर्फे आयोजित 13व्या रमेश देसाई मेमोरियल सीसीआय 16वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात साहेब सोधी, अर्जुन गोहड, बूषन होबम या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत आजचा दिवस गाजवला.
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत 16वर्षाखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या बिगरमानांकीत साहेब सोधी याने कडवी झुंज देत सहाव्या मानांकित गुजरातच्या अर्जुन कुंडूचा टायब्रेकमध्ये 7-6(5), 4-6, 7-6(3) असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. महाराष्ट्राच्या अर्जुन गोहड याने गुजरातच्या तेराव्या मानांकित धन्या शहाचा 1-6, 6-2, 6-1 असा पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली. मणिपूरच्या बुषण हॊबम याने कर्नाटकाच्या सातव्या मानांकित आयुष भटचा 4-6, 6-0, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली. महाराष्ट्राच्या चौदाव्या मानांकित यशराज दळवीने आंध्रप्रदेशच्या अनंत मुनीचा 6-4, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव केला.