नवी दिल्ली- निवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. येत्या 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी निवडणुका होत आहेत, तर 11 तारखेला निकाल लावले जातील. यासोबतच दिल्लीत आचार संहिता लागू झाली आहे. 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत आम आदमी पार्टीला 70 पैकी 67 जागांवर विजय मिळाला होता तर भाजपने 3 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला त्यावेळेस खातेही उघडता आले नव्हते.
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा म्हणाले की, विद्यमान विधानसभेचा कार्यकाळा 22 जानेवारी 2020 ला संपत आहे. 70 विधानसभा जागांसाठी निवडणुकी होतील. दिल्लीत 1 कोटी 46 लाख 92 हजार 136 मतदार आहेत. दिल्लीत 2689 ठिकाणी मतदान पार पडेल. 13 हजार 757 पोलिंग बूथ असतील. निवडणुकीत 90 हजार कर्मचाऱ्यांची गरज भासेल.
दिल्ली विधानसभा निवडणूक 2015 चे निकाल
पक्ष | जिंकलेल्या जागा | वोट शेअर |
आप | 67 | 54.30% |
भाजप | 3 | 32.10% |
काँग्रेस | 0 | 9.60% |
एकूण मतदार : 1,33,13,295 मतदान पडले : 89,36,159 (67.1%)