पुणे-साहित्य क्षेत्रातील अग्रेसर सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या अठराव्या ऐकोणीसव्या वर्धापन दिनानिमीत्त प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी सूर्योदय वाड्.मय पुरस्कारांची घोषणा केली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा डाॅ नागनाथ कोत्तापल्ले ,महाकवी सुधाकर गायधनी,प्रा डाॅ म सु पगारे, सौ माया दिलीप धुप्पड, प्रा बी एन चौधरी, डाॅ संजीवकुमार सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार दिनेश दगडकर , सावळीराम तिदमे या निवड समितीने या पुरस्कारांसाठी खालील नामवंत लेखकांची निवड केलेली आहे.
सुप्रसिद्ध लेखक प्रा भास्कर चंदनशिव (कळंब, जि उस्मानाबाद ) यांना अकराव्या वर्षाचा अखिल भारतीय श्री दलुभाऊ जैन मराठी साहित्य भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून रूपये एकवीस हजाराचा धनादेश, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सुप्रसिद्ध लेखक प्रा डाॅ विश्र्वनाथ शिंदे (कोल्हापूर) यांना श्री दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित पाचव्या वर्षाचा अखिल भारतीय पद्मश्री भवरलालजी जैन सूर्योदय साहित्य रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला असून रूपये एकवीस हजाराचा धनादेश , गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सुप्रसिद्ध लेखिका डाॅ मथू सावंत (नांदेड) यांना श्री दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित स्व सौ कांताबाई भवरलाल जैन यांच्या स्मरणार्थ पंधराव्या वर्षाचा सूर्योदय सेवारत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला असून रूपये अकरा हजाराचा धनादेश , गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सुप्रसिद्ध कवयित्री अंजली कुळकर्णी(पुणे) यांना श्री.दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित स्व.बन्सिलाल – शिवराज जैन , स्व.कांतीलाल हिरालाल चोरडीया यांच्या स्मरणार्थ चौथ्या वर्षाचा सूर्योदय साहित्य भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून रूपये अकरा हजाराचा धनादेश, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
स्व सौ बदामबाई हेमराज देसर्डा, स्व प्रा पन्नालाल भंडारी यांच्या स्मरणार्थ ऐकोणीसव्या वर्षाचा सूर्योदय साहित्य गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध लेखक, संत साहित्याचे अभ्यासक प्रा डाॅ म.रा.जोशी (नागपूर) यांना जाहीर करण्यात आला असून रूपये अकरा हजाराचा धनादेश, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सुप्रसिद्ध कवी धनंजय सोलंकर (पुणे) यांना
राज्यस्तरीय सूर्योदय काव्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून रूपये अकरा हजाराचा धनादेश , गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सुप्रसिद्ध बालसाहित्यिक ॲड विलास मोरे (एरंडोल) यांना सातव्या वर्षाचा सौ लिलाबाई दलिचंद जैन सूर्योदय बाल साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला असून रूपये पाच हजाराचा धनादेश , गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
स्व गोकुळचंद्र लाहोटी यांच्या स्मरणार्थ आठव्या वर्षाचा सूर्योदय सेवाव्रती पुरस्कार आहुर्ली ता इगतपुरी जि नाशिक येथील सुप्रसिद्ध लेखक, व्याख्याते नवनाथ गायकर यांना जाहीर करण्यात आला असून रूपये दोन हजार पाचशेचा धनादेश, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
जळगावी जानेवारी २०२२ मध्ये नियोजित पहिले अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात पुरस्कार प्रदान सोहळा करण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी कळविलेले आहे.