मुंबई-ईडी ने संजय राउत यांना आपल्या कार्यालयात नेण्यासाठी गाडीतून घेऊन जाताना त्यांच्या घराबाहेर जमलेल्या शिवसैनिकांत आणि पोलिसात प्रचंड धक्काबुक्की झाली ,राऊत यांनी जाताना जमावाला हाथ उंचावून अभिवादन केले त्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी त्यांनी ट्वीटर द्वारे पुन्हा संदेश दिला .
आप ऊस व्यक्ती को नहीं हरा सकते, जो कभी हार नहीं मानता! झुकेंगे नही! जय महाराष्ट्र”, असे ट्वीट संजय राऊत यांन केले आहे. ईडीने ताब्यात घेतल्यानंतरचं संजय राऊतांचं पहिलं ट्वीट आहे.
”या कारवाईल मी घाबरत नाही. अश्या प्रकरणानंतर अनेक जण पक्ष सोडून जातात. मात्र, संजय राऊत शिवसेना सोडून जाणार नाही. शिवसेना कमजोर करण्याचा प्रयत्न आहे. मी अधिकाऱ्यांना सहकार्य करतो आहे. माझ्यावर सुडाने कारवाई सुरू आहे. उद्धव ठाकरेंना त्रास देण्यासाठी माझ्यावर कारवाई सुरू आहे. कोणतीही नोटीस न देता ईडीचे अधिकारी माझ्या घरात घुसले”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, “जी कारवाई व्हायची ती होऊ दे, मी घाबरत नाही. राजकीय सुडापोटी हा सर्व खेळ सुरू आहे. माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे. उद्धव ठाकरे, शिवसैनिक यांचं माझ्यामागे बळ आहे. संजय राऊतला शिवसेनेमुळे राज्य व देश ओळखतो. संजय राऊत कधीच गुडघ्यावर चालत नाही, सरपटत नाही. निधड्या छातीने उभा राहतो आणि लढतो. त्यामुळे या कारवाईला देखील मी निधड्या छातीने सामोरं जाणार आहे. यातूनच महाराष्ट्राला बळ मिळेल.”