Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

राणी खनम, ऋजुता सोमण यांच्या नृत्य, तर अजय व अभिजित पोहोनकर यांच्या गायनाने रसिक भारावले

Date:

पुणे : घुंगरांचा छंद, सुर आणि वाद्यांच्या तालाच्या निनादात नेत्र व कर्णसुखाची अनुभुती घेत व दिग्गजांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्याच खास रचनांसह ‘बेल्स इन रेझोनन्स’चा पहिला दिवस रंगला. आपल्या बहारदार नृत्याने लखनौ घराण्यातील प्रसिद्ध कथक नृत्यांगना राणी खनम व रोहिणी भाटे यांच्या शिष्या, नृत्यांगना ऋजुता सोमण यांनी नेत्रदीपक नृत्याविष्कार सादर केला.

शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी कार्यरत ‘ऋत्विक फाउंडेशन’तर्फे शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील दिवंगत दिग्गज गुरूंना समर्पित पहिल्यावहिल्या ‘बेल्स इन रेझोनन्स’ (घुंगरांचा अनुनाद/निनाद) संगीत महोत्सवाचा पहिला दिवस कोथरूडमधील ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स येथील सभागृहात पुणेकरांनी अनुभवला. यंदाचा महोत्सव पद्मविभूषण ज्येष्ठ कथक गुरु पंडित बिरजू महाराज व संगीत नाटक अकादमीचा संगीतरत्न पुरस्कारप्राप्त गुरु पंडिता रोहिणी भाटे यांना समर्पित आहे. गुरू राणी खनम, रोशन दाते, अमला शेखर, ऋजुता सोमण यांनी दीपप्रज्वलन करुन उद्घाटन केले.
महोत्सवाची सुरुवात ऋजुता सोमण यांच्या गणेश वंदनेच्या सादरीकरणाने झाली. ही वंदना स्वतः गुरू पंडिता रोहिणी भाटे लिखित होती. नृत्यपक्ष आणि अभिनय पक्ष यांचे उत्तम सादरीकरण त्यांनी केले. समीर पुणतांबेकर (तबला), मनोज देसाई (गायन), तुलसी कुलकर्णी (पढंत), नासीर खान (सारंगी) यांनी साथसंगत केली.

त्यानंतर पंडित बिरजू महाराज यांच्या शिष्या गुरु राणी खनम यांचा नृत्याविष्कार सादर झाला. त्यांनी धृपदाने सादरीकरणाची सुरुवात केली. मिया तानसेन यांची रचना असलेली ‘पूजन चली महादेव से…’ थाट लखनौ अंदाजाच्या खास रचना पेश केल्या. त्यातील लयकारीत रसिक गुंग झाले. जुन्या बंदिशिंमधील तीहाईचे सादरीकरण त्यांनी केले. घुंगरूच्या निनादात रंगलेल्या या महोत्सवात केवळ घुंगरांच्या बोलावर ढगांचे गडगडणे, विजांचे कडकडणे व थेंबांनी बरसात साकारत त्यांनी रसिकांना कलाविष्कारानी चिंब केले. हजरत अमिर खुसरो यांची पर्शियन अवधी बंदिश रचनेने व नंतर तरण्याने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समरोप केला. यावेळी अमान अली (तबला), मनोज देसाई (हार्मोनियम व गायन), तुलसी कुलकर्णी (पढंत), नासिर खान (सारंगी) यांची साथसंगत होती.

पहिल्या दिवसाचा समारोप ज्येष्ठ गायक पंडित अजय पोहनकर व त्यांचे सुपुत्र अभिजित पोहनकर यांच्या गायनाने झाला. त्यांनी सादर केलेल्या ठुमरीवरील ऋजुता सोमण यांच्या नृत्याची संगत रसिकांना भारावून टाकणारी ठरली. लगन तुसे लागी बलमा.., त्यांच्याच सजनवा या अल्बममधील ‘रांजिशी सही… सैय्या मोसे बोलो बतिया…’ रचना पेश करत रसिकांची भरभरून दाद मिळविली. तंतू वाद्यातून अनुभवायला मिळणारी मिंड ‘कीबोर्ड’मधून ऐकताना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यांना मुकुंदराज देव (तबला), मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), शुभम खंडाळकर (स्वरमंडल), संजय सोनार (तानपुरा) यांची साथसंगत होती.—–दिग्गजांच्या सन्मानासाठी ‘बेल्स इन रेझोनन्स’‘बेल्स इन रेझोनन्स’ महोत्सव दरवर्षी एक एक नृत्यप्रकार व त्यातील मान्यवर गुरूंना समर्पित असणार आहे. यात कथक, भरतनाट्यम, कुचिपुडी, ओडिसी, कथकली, सत्रिया, मोहिनीअट्टम आणि मणिपुरी अशा विविध शास्त्रीय नृत्यशैलींचा समावेश असेल. तरुणपिढीला या दिग्गजांच्या कामाविषयी माहिती व्हावी त्यातून प्रेरणा मिळावी हा यामागचा उद्देश आहे. हा महोत्सव प्रत्येक वर्षी देशातील विविध शहरांमध्ये करण्याचा मानस आहे. देशभरातील सर्वच शास्त्रीय नृत्यशैलींचा सर्व समावेशक असा हा पहिलाच संगीत महोत्सव आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या अभ्यासक्रमांची घोषणा

पुणे :भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजने शैक्षणिक...

मिथक कथेतून वास्तवाचा बोध घ्या :प्रा.अशोक राणा

पुणे :, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या...

व्यवसाय वाढतो तेव्हा ती कला राहत नाही तर विज्ञान होते :सौरभ गाडगीळ

तुळशीबाग व्यापारी कट्टा अंतर्गत मुलाखत पुणे:  व्यवसायाकडे व्यवसाय म्हणून...

अविवेकी लोकांनी आपल्यावर युद्ध लादले:भारतीय सैन्याचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे 

 द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया पुणे विभागाचा...