Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

गळ्यात भगवं उपरणं, हात उंचावून शिवसैनिकांना अभिवादन, भगव्यासाठी लढण्याचा निर्धार, कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू…..

Date:

सर्वांना माहिती आहे,माझ्या विरोधात खोटे कागदपत्रं, खोटे पुरावे..पण मी झुकणार नाही…

मुंबई-  मी बाळासाहेब ठाकरेंचा आणि उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. मी लढणार, आम्ही लढू, महाराष्ट्र इतका कमजोर नाही, शिवसेना कमजोर नाही, असं संजय राऊत म्हणाले. शिंदे गटात सामील झालेल्या संजय शिरसाट यांच्या टीकेवर संजय राऊत यांनी उत्तर दिलं. महाराष्ट्र कमजोर होतोय पेढे वाटा, अशा शब्दात संजय राऊत यांनी शिंदे गटाला फटकारलं आहे.खरी शिवसेना काय आहे ते पाहता आहेत. माझ्या विरोधात खोटे कागदपत्रं, खोटे पुरावे लोकांना मारपीट करुन तयार करण्यात येत आहेत. महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी, शिवसेनेला कमजोर करण्यासाठी करण्यात येत आहे. महाराष्ट्र कमजोर होणार नाही, शिवसेना कमजोर नाही, संजय राऊत झुकणार नाही. महाराष्ट्र कमजोर होतोय, पेढे वाटा, महाराष्ट्रावर हल्ले करण्यात येत आहेत, पेढे वाटा, बेशरम लोक आहात तुम्ही पेढे वाटा, अशा शब्दात संजय राऊत यांनी फटकारलं आहे .सर्वांना माहिती आहे, माझ्या विरोधात चुकीचा गुन्हा लावण्यात आला आहे. ईडी मला अटक करणार आहे आणि मी अटक व्हायला जाणार आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.संजय राऊत झुकणार नाहीत, त्यांच्यावर चुकीची कारवाई करण्यात येत आहे. संजय राऊत यांना चुकीच्या पद्धतीनं फासावर लटकवलं तरी ते शिवसेना सोडणार नाहीत. शेवटच्या श्वासापर्यंत ते उद्धव ठाकरेंसोबत राहणार आहेत. ईडीनं आज मैत्री बंगल्यावर छापा टाकला. तीन मजल्यांची तपासणी केली आहे. संजय राऊतांनी राज्यसभा निवडणुकीसाठी दिलेली कागदपत्रं ईडीला देण्यात आली आहेत. ईडीला पत्राचाळ प्रकरणी एकही कागद मिळालेला नाही. संजय राऊत हे बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत. जे पळून गेले आहेत त्यांच्यासाठी हा मेसेज आहे. संजय राऊत शेवटपर्यंत शिवसेनेसोबत राहणार आहेत.

खासदार संजय राऊत म्हणाले, “माझ्याकडे कोणतेही कागदपत्रे सापडली नाहीत. ते जी पत्राचाळ म्हणत आहेत तो पत्रा गंजलेला आहे की स्टीलचा आहे हेही मला माहिती नाही. ती चाळ कुठे आहे मला माहिती नाही. परंतु तरीही शिवसेना तोडायची, माझा आवाज बंद करायचा, उद्धव ठाकरेंना कमकुवत करायचं हे ठरलं आहे. त्यासाठीच ही कारवाई आहे. मात्र, अशा कारवाईने महाराष्ट्र, शिवसेना कमकुवत होणार नाही. उलट आजच्या माझ्यावरील कारवाईने शिवसेना आणि महाराष्ट्राला लढण्याचं बळ मिळणार असेल तर मी माझं बलिदान द्यायला तयार आहे.”ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांनी फोनवर बोलत अशा कारवायांपुढे झुकणार नाही, शिवसेना सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली. ते टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

“महाराष्ट्रात भाजपाच्या विरोधकांवर राजकीय सुडाने कारवाया सुरू आहेत. त्याविरोधात माझ्यावरील कारवाईने बळ मिळेल. आमच्यासारखे काही लोक आहेत जे न झुकता, न घाबरता कारवायांना सामोरं जातात आणि लढाई लढतात, असा संदेश जाईल. अशा कारवायांच्या भीतीने अनेकजण पक्ष सोडून जातात, शरणागती पत्करतात. मात्र, संजय राऊत त्यातील नाही. मरेन पण झुकणार नाही, वाकणार नाही, शिवसेना सोडणार नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.संजय राऊत म्हणाले, “जी कारवाई व्हायची ती होऊ दे, मी घाबरत नाही. राजकीय सुडापोटी हा सर्व खेळ सुरू आहे. माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे. उद्धव ठाकरे, शिवसैनिक यांचं माझ्यामागे बळ आहे. संजय राऊतला शिवसेनेमुळे राज्य व देश ओळखतो. संजय राऊत कधीच गुडघ्यावर चालत नाही, सरपटत नाही. निधड्या छातीने उभा राहतो आणि लढतो. त्यामुळे या कारवाईला देखील मी निधड्या छातीने सामोरं जाणार आहे. यातूनच महाराष्ट्राला बळ मिळेल.”

संजय राऊत पुढे म्हणाले, “माझ्याकडे कोणतेही कागदपत्रे सापडली नाहीत. ते जी पत्राचाळ म्हणत आहेत तो पत्रा गंजलेला आहे की स्टीलचा आहे हेही मला माहिती नाही. ती चाळ कुठे आहे मला माहिती नाही. परंतु तरीही शिवसेना तोडायची, माझा आवाज बंद करायचा, उद्धव ठाकरेंना कमकुवत करायचं हे ठरलं आहे. त्यासाठीच ही कारवाई आहे. मात्र, अशा कारवाईने महाराष्ट्र, शिवसेना कमकुवत होणार नाही. उलट आजच्या माझ्यावरील कारवाईने शिवसेना आणि महाराष्ट्राला लढण्याचं बळ मिळणार असेल तर मी माझं बलिदान द्यायला तयार आहे.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....

लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर: हर्षवर्धन सपकाळ.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष...