Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची 39 वी बैठक संपन्न

Date:

नवी दिल्ली-केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची 39 वी बैठक, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथील राष्ट्रीय प्राणीशास्त्र उद्यान येथे पार पडली.

हिम बिबट्याविषयी राष्ट्रीय स्टड बुक आणि प्राणी संग्रहालयांचा विकास,संशोधन कार्यक्रम याबाबत अद्ययावत माहिती देणारे केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण त्रैमासिक वृत्तपत्र या  दोन पुस्तिकांचे बैठकीदरम्यान प्रकाशन  करण्यात आले.

यावेळी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाद्वारे 2021-22 या आर्थिक वर्षात केलेल्या उपक्रमांची सदस्यांना माहिती देण्यात आली.

बैठकीदरम्यान, तांत्रिक समिती आणि प्रशासकीय समितीच्या शिफारशींचा आढावा घेऊन  ते मंजूर करण्यात आले.  इतर चर्चांमध्ये केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाचा वार्षिक अहवाल (2021-22) आणि भारतीय प्राणीसंग्रहालयांमधील प्राण्यांचा ताबा  आणि हस्तांतरण करण्याच्या प्रस्तावांचा समावेश होता.

भारतीय प्राणीसंग्रहालयासाठी राजदूत म्हणून कार्य करू शकणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावांवर विचार करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा करण्यात आली.  प्राणिसंग्रहालयांनी हाती घेतलेल्या संवर्धन उपक्रमांना पाठिंबा मिळावा आणि या क्षेत्रातील बहु-क्षेत्रीय,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ही चर्चा करण्यात आली.

भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण (http://cza.nic.in/) ही एक वैधानिक संस्था आहे. भारतीय प्राणीसंग्रहालयांच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी आणि अद्ययावत उपायांद्वारे वन्यजीव संरक्षण धोरणांना पूरक म्हणून 1992 मध्ये भारतीय वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 मध्ये सुधारणा करून त्याची स्थापना करण्यात आली.  केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाचे मार्गदर्शक उद्दिष्ट भारतीय प्राणीसंग्रहालयातल्या प्राण्यांच्या निवास, संगोपन आणि आरोग्यसेवेसाठी सर्वोत्तम पद्धती सुनिश्चित करणे हे आहे. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाअंतर्गत  147 प्राणीसंग्रहालये येतात.  प्राणीसंग्रहालये संवर्धन जागरुकता, दुर्मिळ प्रजातींचे  प्रदर्शन, बचाव आणि पुनर्वसन आणि धोक्यात आलेल्या प्रजातींसाठी संवर्धन प्रजनन कार्यक्रम यासारखे अनेक उपक्रम राबवतात.  सुमारे 8 कोटी लोक वर्षाकाठी या प्राणी संग्रहालयांना भेट देतात. प्राणीसंग्रहालये ही  वन्यजीव संरक्षण आणि जागरूकता यासाठी शिक्षण केंद्रे म्हणून काम करतात.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...

ट्रम्प म्हणाले- भारत-पाककडे खूप अण्वस्त्रे, आम्ही अण्वस्त्र युध्द थांबवले

इस्लामाबाद -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही दोन...

उद्या दहावी बोर्डाचा निकाल:अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता पाहता येणार

यंदा परीक्षेला 16 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले ...पुणे-महाराष्ट्र राज्य...

“रेड 2 ने १०० कोटींचा टप्पा पार केला, याबद्दल मी मनापासून आभारी आहे!” – वाणी कपूर

ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘रेड’ चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘रेड 2’ ने...