पुणे-कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम लवकरच सुरु होत असून याचे श्रेय राष्ट्रवादीचेच आहे . भाजपचे आ. टिळेकर यांनी या साठी काहीही केले नाही ते निव्वळ श्रेय लाटू पाहत आहेत असे सांगत टिळेकर यांनी या रस्त्याच्या कामासाठी काही केले नसल्याचा आरोप या भागातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक प्रकाश कदम यांनी केला आहे .
कदम यांनी कात्रज येथे माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले कि,कात्रज कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसनेच पहिले आंदोलन केले ,बजेट मध्ये पहिली आर्थिक तरतूद केली.सत्तांतरानंतर तातडीने रुंदीकरण सुरु व्हायला हवे होते तर ते भाजपच्या कारभारामुळे टेंडर पे टेंडर प्रकरणात रखडले आणि अखेर आता स्थायी समितीत रुंदीकरणाचे टेंडर मंजूर झाले आहे मुख्य सभेतही ते होईल आणि लवकरच या रस्त्याच्या कामाला प्रारंभ होईल . मात्र हे सारे राष्ट्रवादीच्याच प्रयत्नाने होते आहे .असे असतानाही भाजपचे आ. टिळेकर हे मात्र निव्वळ श्रेय लाटण्यासाठी दिशाभूल करत आहेत .पण कात्रजकरांना खरी परिस्थिती ठाऊक आहे
कात्रज कोंढवा रस्त्याचं श्रेय आ.टिळेकरांना नाहीच, हे काम राष्ट्रवादीचे -प्रकाश कदम
Date:

