पुणे
पुणे महानगरपालिका निवडणुक २०१७ च्या पार्श्वभूमीवर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी ‘वक्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. हे प्रशिक्षण शिबीर, दिनांक २३ जानेवारी रोजी आय एम ए हॉल, टिळक रोड येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत होते.
या वक्ता प्रशिक्षण शिबीरात पक्षाचे इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांचे प्रचार मोहिमेमध्ये उमेदवारांचे व कार्यकर्त्यांचे स्वतःचे वर्तन व आपल्या प्रचाराची पद्धत कशी असावी याविषयी “वक्ता प्रशिक्षण शिबीराचे ” आयोजन करण्यात आले होते .
या शिबिराच्या पहिल्या सत्रात दत्ता बाळसराफ यांनी ‘भारतीय राष्ट्रवाद’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसची नेतृत्वाची फळी उत्तम आहे. नव्या पिढीला ज्या भाषेत सांगण्याची गरज आहे त्यापद्धतीने त्यांना सांगितले पाहिजे. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर जास्त करा. एकही संधी आपण गमावता कामा नये. काही ठळक मुद्दे वारंवार मतदारांवर बिंबवले पाहिजेत. तरच त्यांना आपल्याबद्दल विश्वास वाटतो . मुस्लिम आणि दलित समाजामध्ये अस्वस्थता आहे. ती अस्वस्थता बाहेर आली पाहिजे’.
किशोर रक्ताटे यांनी भाषण कसे करावे.कोणत्या मुद्यावरती बोलावे हे सांगितले. गिरीश अवघडे यांनी समाजातील सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडींबाबत कार्यकर्त्यांशी संवाद केला, पक्षाचे जेष्ठ प्रवक्ते अंकुश काकडे यांनी उपस्थितांना संभाषण कला कशी असावी, मुद्देसूद भाषण कसे करावे, रोजच्या ठळक घडामोडींचा अभ्यास असावा तसेच रोजचे वर्तमानपत्र वाचले पाहिजे असे मुद्दे मांडले .
शहराध्यक्ष, खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी मार्गदर्शनपार भाषणात म्हणाल्या,’ सोशल मीडियाचा वापर वाढला पाहिजे . नागरिकांपुढे आपली भूमिका प्रभावीपणे मांडता आली पाहिजे . राष्ट्रवादीकाँग्रेस पक्षाने कोणती विकास कामे केली आहेत हे प्रभावीपणे मांडता आले तरच भाजप पेक्षा आपण वेगळे आहोत हे नागरिकांना समजू शकते.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष अशोक राठी यांनी नोटबंदीबाबत मार्गदर्शन केले. नोटबंदीवरती आणि कॅशलेसवर या दोन विषयावर मार्गदर्शन केले. या सरकारचे आरक्षणविरोधी धोरण आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दुट्टपी भूमिका पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष अशोक राठी यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केले . या प्रशिक्षण शिबीरात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

