कलवट ब्रीज विकसित करणे कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न
पुणे–नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांच्या विकास निधीतून ऐतिहासिक मार्ग तसेच कलवट ब्रीज विकसित करणे या कामाचा भूमिपूजन समारंभ शिवसेनेचे शहरअध्यक्ष माजी आमदार महादेव बाबर तसेच नगसेवक आनंद आलकुंटे यांच्या शुभहस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाला,हा रस्ता महंमदवाडी रोड ते हेवन पार्क ला जोडला जाणारा रस्ता आहे ,यापूर्वी महंमदवाडी रोड ते हेवन पार्क ला जोडला जाणारा रस्ता, हा कृष्णा नगर येथून, अरुंद होता ,या मुळे नागरिकांना प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी ला तसेच अनेक समस्याना,सामोरे जावे लागत होते, या रस्त्याचे काम पूर्ण झाल्या नंतर नुकताच झालेल्या राजकीय आणि सामाजिक यांच्या प्रयत्नातून ससाणे नगर भुयारी मार्गाचे भूमिपूजन पार पडत असताना, नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला, रेल्वे फाटकाच्या त्रासाला व पर्यायी मार्गाला वेळ, इंधन ,अश्या प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागणार ,असे निदर्शनास येणार असल्या कारणानें चालक्य नीती ,बुद्धी मतेच्या जोरावर, व परिस्थिती चे गांभिर्य लक्षात घेऊन. ऐताहासिक या रस्ता च्या नियोजन साठी तयारी चालू झाली, या कामासाठी खासदार शिवाजी अढाळराव पाटील ,माजी आमदार महादेव बाबर ,नगरसेवक आनंद आलकुंटे यांनी तसेच स्थानिक शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या सतत पाठपुरावा,व अधिकाऱ्यांनी, प्रचंड प्रमाणात सहकार्य केल्या बद्दल नाना भानगिरे यांनी आभार व्यक्त केले.
या वेळी उदोगपती संदीप जरांडे, बाळासाहेब बिबवे,पांडुरंग आंबेकर,लोंढे आण्णा,उदोगपती नारायण तरवडे, शांताराम जाधव, प्रकाश तरवडे,कपिल तरवडे,मयूर तरवडे,पोपट आंबेकर,विनोद आंबेकर, विजय चव्हाण,विकास भुजबळ,सचिन तरवडे,राम तरवडे,अतुल तरवडे,बाळासाहेब तरवडे,उत्तम घुले,नंदू जाधव, विश्वास पोळ,संदीप राऊत, सुनील पाटील,विक्रम फुकटे,नाना बारगगुळे,दादा शिंदे ,संदीप शिंदे,तरवडे पपत्रकार बांधव व शिवसैनिक जेष्ठ नागरिक उपस्थित होते.