नदी ही आपल्या संस्कृतीची, जीवनशैलीची, अस्तित्वाची ओळख:महापौर मंजुषा नागपुरे

Date:

पुणे- नदी ही केवळ वाहणारे पाणी नसून ती आपल्या संस्कृतीची, जीवनशैलीची आणि अस्तित्वाची ओळख आहे. हीच जाणीव समाजात निर्माण करण्यासाठी आणि “स्वच्छ नदी समृद्ध जीवन” या संदेशाला कृतीची जोड देण्यासाठी पुणे महानगरपलिका घनकचरा व्यवस्थापन व पर्यावरण विभागामार्फत नदी महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवाच्या माध्यमातून नदी स्वच्छता, जनजागृती, लोकसहभाग आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असे प्रतिपादन येथे महापौर मंजुषा नागपुरे यांनी केले. महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग व पर्यावरण विभागामार्फत जागतिक वसुंधरा दिनानिमित्त दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी शहरस्तरीय नदी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त दिनांक २२/०४/२०२६ रोजी स.६.३० ते १०.०० या वेळेत विठ्ठल मंदिर, विठ्ठलवाडी, सिंहगड रोड याठिकाणी “नदी महोत्सब २०२६” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर मोहिमेचे उद्घाटन समारंभ महापौर यांचे हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सनई-डोल वादनाने करण्यात आली. यानंतर वृक्ष जलार्पण, शंखनाद व नदी आरती यांसारख्या पारंपरिक उपक्रमांनी वातावरण भारावून गेले. पर्यावरण विभाग उप आयुक्त किशोरी शिंदे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना दिली. यामध्ये पंतप्रधान यांनी दिलेल्या मिशन लाईफच्या संकल्पनेनुसार प्रत्यकाने आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी अंगीकारल्या पाहिजेत याची आठवण करून दिली. तसेच महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानच्या माध्यमातून आपण पर्यावरणातील पंचमहाभूते भूमी, जल, वायू, अग्नि व आकाश यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य, बैंड मादरीकरण तसेच नदी संवर्धनावर आधारित माहितीपट सादर करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत नदी गीताचे व माहितीपटाचे अनावरण महापौर, मंजुषा नागपुरे यांनी केले.
नदी स्वच्छता व संवर्धनाबाबत मनोगत व्यक्त करताना आयुक्त यांनी नदी महोत्सव यांसारखे उपक्रम वारंवार आयोजित केले पाहिजे तसेच युनायटेड नेशनच्या शाश्वत विकास ध्येयांवर विविध विभागांच्या ‘माध्यामातून काम करणे आवश्यक आहे असे सांगितले. याशिवाय मिशन लाईफच्या प्रत्येक मुद्यांवर काम केल्यास वाराणसी घाट जसा जागतिक दर्जा प्राप्त करू शकतो व पटना शहरातील नदीचा घाट हा एक सुंदर पर्यटन स्थळ होवू शकतो, त्याचप्रमाणे पुणे शहरातील सर्व नागरीकांनी प्रशासनासोबत काम केल्यास मुळा-मुठानदीच्या प्रदूषण कमी होवून लोकसहभागातून येत्या एक ते दिड वर्षांमध्ये नदीचा कायापालट आपण सर्वजण करू शकतो असा विश्वास व्यक्त केला.
महापौर, मंजुषा नागपुरे यांनी मनोगत व्यक्त करताना महापालिका आवारात प्लास्टिक बंदी करण्याचे आव्हान प्रशासनास दिले. पर्यावरण संवर्धनाकारीता सर्व स्तरांतून प्रयत्न करणे आवश्यक आहे व प्रदूषणाच्या समस्यांचे निराकरण करताना नागरिकांना पर्याय देखील उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे नमूद केले. शहरातील विविध प्रकारचे प्रदूषण कमी करण्याच्या अनुषंगाने पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये, तज्ञ व्यक्ती, स्टार्टअप यांच्या सूचना, आभ्यास व उपाययोजना प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न प्रशासनाने करणे आवश्यक असल्याचे सांगितले. जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्त आपला ग्रह, आपली उर्जा असून आपण सर्वांनी मिळून एकत्र काम केल्यास आपले पुणे स्वच्छ पुणे, स्वस्थ पुणे होवू शकते अशी आशा व्यक्त केली. याप्रसंगी उपमहापौर व इतर मान्यवर यांनी देखील मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केली.
या उपक्रमाच्या अनुषंगाने दिनांक १६ ते २१ एप्रिल २०२६ या कालावधीमध्ये संगम वाडी, ओंकारेश्वर तसेच शहरातील सर्व नदी पात्रांमध्ये व घाटांमध्ये डीप क्लीन ड्राइव्ह आयोजित करण्यात आले. या डीप क्लीन ड्राईव्ह अंतर्गत नदीच्या पात्राच्या परिसरातून ४.२ टन प्लॅस्टिक, १२.३ टन राडारोडा व ७.४ टन इतर कचरा गोळा करण्यात आला.
नदी महोत्सव कार्यक्रमात महापौर सौ. मंजुषा नागपुरे,महापालिका आयुक्त नवल किशोर राम, विरोधी पक्ष नेते निलेश निकम तसेच सोपानकाका चव्हाण, अॅड. रामचंद्र कदम,अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजीत नायर, ओमप्रकाश दिवटे,कुमार भाऊ गोसावी,नगरसेविका वृषाली आनंद रिठे, प्रिया शिवाजी गदादे, कोमल सारंग नवले, जयश्री सत्यवान भुमकर, ज्योती किशोर गोसावी, सचिन रावसाहेब मोरे, सुनिल शिंदे, . उपायुक्त अविनाश सकपाळ. संतोष वारुळे, किशोरी शिंदे, गणेश सोनुने, संदिप कदम, आशा राऊत, महापालिका सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. माधना भांगरे, विजय कुमार वाघमोडे, , सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय, पुणे महानगरपालिका अंतर्गत कार्यरत विविध खातेप्रमुख, इतर अधिकारी व कर्मचारी इ. उपस्थित होते. तसेच भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्था, वर्शिप अर्थ फाउंडेशन, जी.टी.टी. फाउंडेशन, इकोएक्झिस्ट फाउंडेशन, पुणे, सागरमित्र पवनमित्र अभियान, जीटीटी फाउंडेशन, अंकुर सेंटर, लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन, जल बिरादरी, कर्नल साठे, एल. एम. (ग्रीन थंब, पर्यावरण गट), गंगोत्री एनर्जी प्रोजेक्ट्स प्रा. लि., जीवितनदी, बीकेपीएस कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पीव्हीजी कॉलेज, नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटी, विधिवत – धार्मिक साहित्याचा पुनर्वापर (मूर्ती, फ्रेम्स, पुस्तके आणि पवित्र वस्तू), यार्दी CSR, पर्यावरण विभाग, घनकचरा व्यवस्थापनविभाग, स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था, ड्रेनेज विभाग, उद्यान विभाग, KKNAG, do save foundation, अपेक्स कमिटी सदस्य अशा विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते.
नदी महोत्सव कार्यक्रमात जवळपास २००० नागरीकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांनी नदी संवर्धनासाठी सक्रिय सहभाग नोंदवण्याचा संकल्प केला आणि माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरण विभागामार्फत त्यांना ई शपथ देण्यात आली तसेच उद्यान विभागा मार्फत रोपे वाटप करण्यात आली. पुणे शहर स्वच्छ व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘त्या’महिलेचा VDO चित्रित करणाऱ्या पत्रकारांना भाजपाकडून धमक्या, म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’.

मुंबई, दि. २२ एप्रिल २०२६.. भारतीय जनता पक्षाला महिला आरक्षणावर...

क्रांतीज्योती बाल संगोपन योजनेचा 8 हजाराहून अधिक लाभार्थ्यांना लाभ

पुणे, दि. 22: माहे एप्रिल 2025 अखेर क्रांतीज्योती बाल...

YES BANK तर्फे नफ्यात सातत्यपूर्ण वाढ,तिमाहीत 1,068 कोटी रु.चा निव्वळ नफा

विकासाला गती, CASA मध्ये उत्कृष्ट कामगिरी, सुधारित मार्जिन्स आणि...

गोदरेज इंडस्ट्रीजचे २०३१ पर्यंत ५ लाख कोटींचे उद्दिष्ट

'१८९७ पासून निरंतर निर्मिती, प्रत्येक येणाऱ्या उद्याची' (Crafting tomorrow since 1897) हे कंपनीचे सामायिक ध्येय मुंबई, २२ एप्रिल, २०२६: गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपने आज आपले नवे ध्येय आणि नवी ब्रँड ओळख प्रस्तुत केली....