पुणे-बी. जे. मेडिकल महाविद्यालय मध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीने परिक्षेचा अभ्यास न झाल्याने आलेल्या नैराश्यातून ससून रूग्णालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरूणीला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.
अदिती दलभंजन (वय – 20, रा. आनंदनगर, सिंहगडरोड,पुणे) असे आत्महत्या करण्यात आलेल्या विद्यार्थीनेचे नाव आहे. याबाबत बंडगार्डन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर याठिकाणी आदिती ही कुटुंबासमवेत राहण्यासाठी होती. वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेत तिने चांगल्या प्रकारे यश संपादन करून प्रसिद्ध बी जे मेडीकल महाविद्यालयात प्रथम वर्षाला प्रवेश घेतला होता. परंतु, तिच्या कॉलेजच्या परिक्षेचा अभ्यास न झाल्याने तीला नैराश्य आले होते.याबाबत तिने वडीलांना याची कल्पना देखील दिली होती.
बुधवारी सकाळी साडेदहा वाजता तिचे वडील तिला नेहमीप्रमाणे तिच्या कॉलेजमध्ये सोडून गेले. परंतु, अभ्यास न झाल्याने तिने थेट ससून रूग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तिने आत्महत्या करताना तिचा मोबाईल टेरेसवरच ठेवला होता. गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास बंडगार्डन पोलिस करत आहे अशी माहिती बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली आहे.