पुणे- शहरात तेही गजबजलेल्या रस्त्यावर म्हणजे जिथून पोलीस , रुग्णालय रेल्वे ,बस स्थानके जवळच आहेत अशा मालधक्का चौकात जिममध्ये काम करणाऱ्या,दुचाकीवरुन जाणाऱ्या व्यक्तीला धमकी देऊन पावणेदोन लाख रुपयांचा ऐवजजबरदस्तीने लुटून नेणाऱ्या चार चोरट्यांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.विशेष म्हणजे यात तिघे १९ वर्षांची मुले आहेत,तर एक जन २३ वर्षाचा आहे या चोरट्यांनी एक लाख रुपये किंमतीची महागडी केटीएम दुचाकी, 50 हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि 25 हजार रुपयांचे आयपॅड असा पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरला होता. चोरी करुन ते पसार झाले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
राहुल खुशीयाल सारसर (वय.19,रा. कमेला झोपडपट्टी साळुंखे विहार रोड कोंढवा),हर्षद अंकुश शेळके (वय.19), अनुराग गौतम बद्रीके (वय.19,रा. खडकी) आणि सौरभ संजय चव्हाण (वय.23),अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. यातील अनुराग बद्रिके आणि राहुल सारसर हे सराईत गुन्हेगार आहेत.याबाबत धर्मेश मनोहर नानी (वय-27,रा.विष्णू विहार सोसायटी बिबवेवाडी,पुणे) यांनी पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार बंडगार्डन पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला. ही घटना 22 मार्च रोजी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास मालधक्का चौकात घडली होती.
तक्रारदार धर्मेश नानी हे त्यांच्या दुचाकीवरून मालधक्का चौकातून जात असताना, आरोपींनी त्यांच्या दुचाकीस पाठीमागून धडक दिली. त्यावेळी ते रस्त्यावर खाली पडले असता, आरोपींनी शिवीगाळ करत तरुणास मारहाण केली. त्यामध्ये तरुण जखमी झाला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांची दुचाकी व इतर मौल्यवान ऐवज जबरदस्तीने हिसकावून पळ काढला.संबंधित प्रकार घडल्यानंतर नानी यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली होती. संबधीत गुन्ह्याचा तपास करत असताना, पोलिसांनी माहिती मिळाली की, हा गुन्हा कोंढवा व खडकी येथील संशयित रेकॉर्ड वरील आरोपींनी केला आहे. तांत्रिकविश्लेषन व सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी चार आरोपींचा माग काढून त्यांना अटक केली.त्यांच्याकडे केलेल्या चौकशी त्यांनी गुन्ह्याची कुबूली दिली आहे. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील, गुन्हे निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलिस उपनिरीक्षक रविंद्र गावडे, कर्मचारी शिवाजी सरक, अनिल कुसाळकर, सागर घोरपडे यांनी केली आहे.