हरियाणात जिथे लपला त्या घराच्या मालकिणीची चौकशी
चंदिगड- खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग अद्याप फरार आहे. पंजाब पोलिसांना गुरुवारी सलग 6 व्या दिवशी त्याचा शोध घेत आहेत. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, अमृतपाल पंजाबमधून पसार झाला आहे. तो उत्तराखंडमध्ये लपल्याचा संशय आहे. पंजाबमधून बाहेर पडल्यानंतर तो हरियाणात गेला. तिथे 19-20 मार्च रोजी कुरुक्षेत्र जिल्ह्यातील शाहबाद येथे थांबला.शाहबाद येथे तो एका महिलेच्या घरी थांबला. पोलिस या महिलेची चौकशी करत आहेत. दुसरीकडे, पोलिसांना अमृतपाल महाराष्ट्रातील नांदेड येथे लपल्याचीही खबर मिळाली आहे. त्यानुसार पंजाब पोलिसांचे एक पथक छापेमारीसाठी नांदेडच्या दिशेने रवाना झाले आहे.
पंजाबचे शेजारी राज्य उत्तराखंडमध्येही अमृतपालसंबंधी अलर्ट जारी करण्यात आला आहे. या प्रकरणी गुरुघरांचीही चौकशी केली जात आहे. पोलिसांनी अमृतपालचा सहकारी तजिंदर सिंग उर्फ गोरखा बाबाला लुधियानातून अटक केली आहे. तो अमृतपालचा गनर आहे.अमृतपालच्या 11 साथीदारांना अजनाला पोलिसांनी बाबा बकाला न्यायालयातून ट्रान्झिट रिमांडवर घेतले. त्यानंतर या सर्वांना अजनाला न्यायालयात हजर करण्यात आले.पोलिस व गुप्तहेर यंत्रणांच्या तपासात निष्पन्न झाले आहे की, अमृतपालला 158 परदेशी खात्यांतून फंडिंग सुरू होती. त्यातील 28 खात्यांद्वारे त्याला 5 कोटींहून अधिकची रक्कम पाठवण्यात आली होती. या खात्यांचा संबंध पंजाबच्या माझा व मालवाशी आहे. अमृतसर, तरणतारन, बगटाला, गुरुदासपूर, जालंधर, नवांशहर, कपूरथला व फगवाडा येथील खात्यांचाही अमृतपालशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे.