गणेशोत्सवात दरोड्याची तयारी; एरंडवण्यात पाच जण हत्यारांसह पकडले

Date:

अचानक मित्र मंडळ परिसरात डेक्कन पोलिसांची कारवाई; लाल तिखट, धारदार हत्यारे आणि इतर साहित्य जप्त

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एरंडवणे परिसरात दरोड्याच्या तयारीत लपून बसलेल्या पाच जणांना डेक्कन पोलिसांनी धारदार हत्यारांसह पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवानिमित्त डेक्कन पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार सचिन गायकवाड यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एरंडवणे येथील अचानक मित्र मंडळ परिसरात गणेश मंदिराच्या मजल्यावर सहा ते सात जण दरोडा टाकण्याच्या तयारीत धारदार हत्यारे, लाल तिखट आणि इतर साहित्य घेऊन लपून बसले आहेत.

माहिती मिळताच डेक्कन पोलिसांचे पथक संबंधित ठिकाणी पोहोचले. अचानक मित्र मंडळासमोरील दोन मजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाऊन पोलिसांनी दरवाजा उघडण्यास सांगितले. दरवाजा उघडल्यानंतर आत पाच जण आढळले. तेथे टेबलवर धारदार हत्यारे, लाल रंगाची तिखट पावडर आणि इतर साहित्य मिळाले. त्यानंतर पाचही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अशी आहेत — रितेश गुरुनाथ चिप्पा, वय २५ वर्षे, रा. ५२६, गंजपेठ, महात्मा फुले वाड्यासमोर, समता भूमी, पुणे; विकास नितीन लांबोर, वय १९ वर्षे, रा. प्लॉट नं. १५, संजीवनी हॉस्पिटलजवळ, खिलारेवाडी, पुणे; प्रतीक हनुमंत कांबळे, वय १९ वर्षे, रा. सीडीएस कंपनीजवळ, गणेशनगर, चाळ नं. १०, एरंडवणे, अलंकार, पुणे; प्रतीक रामचंद्र कदम उर्फ बाबू, वय २३ वर्षे, रा. प्लॉट नं. १५, संजीवनी हॉस्पिटलजवळ, खिलारेवाडी, पुणे; आणि सुजल मनोज मोरे, वय १९ वर्षे, रा. चाळ नं. A/3/18, खोली नं. २०, इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे.

या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 278/2026 दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम 310(4), आर्म्स अॅक्ट कलम 4(25), तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1) सह 135 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रणजितसिंग परदेशी, सपना देवतळे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक योगेश मोरे, अजय भोसले, सहाय्यक पोलीस फौजदार दत्तात्रय शिंदे, प्रशांत पवार, राजेंद्र मारणे, धनश्री सुपेकर तसेच पोलीस अंमलदार सचिन गायकवाड, सागर घाडगे, वसीम सिद्दीकी, धनाजी माळी आणि स्वप्निल गायकवाड यांनी ही कारवाई केली.

या प्रकरणाचा पुढील तपास डेक्कन पोलीस करीत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

घरफोडी, मारहाण, सायबर फसवणूक, चेन चोरी ते दागिन्यांची चोरी

पुणे, २६ सप्टेंबर २०२६ : पुणे शहरात गणेश विसर्जन...

राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर;शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना लागू

राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार मुंबई, दि....

शाहबाज शरीफ यांचा UNमधून भारताला इशारा; सिंधूच्या पाण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

“सिंधू जल कराराचे उल्लंघन युद्धकृती मानू”; काश्मीरचा मुद्दाही उपस्थित...