पीसीपीएनडीटी-एमटीपी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्कफोर्सच्या कामाला गती; ऑक्टोबरमध्ये कृती आराखडा

Date:

डॉ. नीलम गोऱ्हे यांची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी चर्चा; विभागीय बैठका घेऊन महिलांच्या सूचनांचा समावेश करणार

पुणे.दि.२३: पीसीपीएनडीटी आणि एमटीपी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी तसेच महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या टास्कफोर्सच्या कामाला गती देण्याच्या दृष्टीने शिवसेना नेत्या व विधान परिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत टास्कफोर्सच्या आगामी कामकाजाची दिशा, बैठकींचे नियोजन आणि आतापर्यंत समोर आलेल्या प्राथमिक निष्कर्षांबाबत सविस्तर चर्चा झाली.

पीसीपीएनडीटी आणि एमटीपी कायद्यांच्या अनुषंगाने ८ सप्टेंबर रोजी टास्कफोर्सची नियुक्ती करण्यात आली असून, त्यामध्ये डॉ. नीलम गोऱ्हे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह सहा महिला आमदारांचा या टास्कफोर्समध्ये समावेश आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी टास्कफोर्सच्या कामाची पद्धत, आवश्यक प्रशासकीय व्यवस्था तसेच पुढील कार्यवाहीबाबत आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली.

टास्कफोर्सच्या कामासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय व इतर व्यवस्थांबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पुढाकार घेण्याची भूमिका व्यक्त केली. ऑक्टोबर महिन्यात टास्कफोर्सची बैठक घेऊन प्रत्यक्ष कामकाजाची आखणी करण्यात येणार असल्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.

दुष्काळ, पाणीटंचाई आणि आरोग्याचा संबंधही अभ्यासणार

दुष्काळी परिस्थिती आणि आरोग्याचा जवळचा संबंध लक्षात घेता, पाणीटंचाई, दूषित पाणी तसेच त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांबाबतही टास्कफोर्सच्या कामातून समोर येणाऱ्या मुद्द्यांचा संबंधित विभागांमार्फत पाठपुरावा करण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली. आरोग्यमंत्र्यांनी हे मुद्दे संबंधित मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांकडे पाठवावेत, जेणेकरून त्यावर समन्वयाने कार्यवाही करता येईल, अशी भूमिका डॉ. गोऱ्हे यांनी मांडली.

महिलांच्या सहभागातून विभागनिहाय अभ्यास

महाराष्ट्रातील महिला आरोग्य, पीसीपीएनडीटी आणि एमटीपी कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्या, संस्था आणि संबंधित घटकांशी संवाद साधण्यासाठी विभागनिहाय बैठका घेण्याचे नियोजन डॉ. गोऱ्हे यांनी केले आहे. आवश्यकतेनुसार काही बैठका ऑनलाइनही घेण्यात येणार आहेत. विविध विभागांतून प्राप्त होणाऱ्या सूचना, अनुभव आणि स्थानिक पातळीवरील अडचणींच्या आधारे टास्कफोर्सच्या पुढील कामाला गती देण्यात येणार आहे.

यावेळी टास्कफोर्सच्या माध्यमातून पुढील पाठपुराव्याचे विविध मुद्दे निश्चित करण्यात आले. तसेच या उपक्रमाची माहिती मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांच्या सूचनांचाही विचार करणे महत्त्वाचे असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

दरम्यान, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती सायंकाळी ६ वाजता मंडईतून विसर्जन मिरवणूकीत होणार सहभागी

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या विसर्जन सोहळ्याची रूपरेषा जाहीर सुवर्णगणेश...

गणेशोत्सवात राबणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान

शनिपार मंडळ ट्रस्टतर्फे ५० स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गौरवपुणे : गणेशोत्सवाच्या...