महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक:निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांची बैठक संपन्न

Date:

पुणे, दि. २३ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघ आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आदर्श आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू झाली आहे. त्यानुसार सर्व राजकीय पक्षांनी भारत निवडणूक आयोगाच्या आचारसंहितासंबंधित निर्देशांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली – उगले यांनी केले आहे. या निवडणुकीत मतदान करता यावे म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या १० दिवस अगोदरपर्यंत नवीन मतदार नोंदणीसाठीच्या दाखल अर्जांवर कार्यवाही करता येईल, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.

भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकांची घोषणा मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) केली आहे. या निवडणूक कार्यक्रमाची व निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती राजकीय पक्षांना देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी विभागातील पुणे जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष तर सोलापूर, सातारा, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील प्रतिनिधी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. पाचही जिल्ह्यातील जिल्हा निवडणूक प्रशासन, पोलीस प्रशासन, महानगरपालिका आदींचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सार्वत्रिक वा पोटनिवडणुकांसाठींच्या आचारसंहिताविषयक तरतुदी या निवडणुकीसाठीही लागू असतात, अशी माहिती देऊन विभागीय आयुक्त म्हणाल्या, या आचारसंहिता विषयक तरतुदींचे मार्गदर्शक पुस्तिका जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून तसेच आयोगाच्या आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावरून उपलब्ध होतील. विभागातील सर्व जिल्हाधिकारी हे त्या- त्या जिल्ह्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत.

त्यांनी पुढे सांगितले, या निवडणुकीसाठी मतदान करता यावे यासाठी नव्याने मतदार नोंदणीची संधी सर्वसाधारणपणे २६ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. यासाठीचे अर्ज पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडे जमा करावेत. त्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयात उपलब्ध आहे. जानेवारी २०२६ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीनुसार पुणे विभागात ३ लाख ७ हजार ८२३ पदवीधर तर ५१ हजार ७५० शिक्षक मतदार आहेत. त्यानंतर झालेल्या मतदार नोंदणीची व नव्याने २६ सप्टेंबरपर्यंत होणाऱ्या मतदार नोंदणीनुसार मतदार संख्येत बदल होणार असून त्याप्रमाणे मतदारांना मतदान करता येणार आहे.

या निवडणूकीतील मतदान मतपत्रिकेद्वारे पसंतीक्रम नोंदवून करण्यात येते. त्यादृष्टीने निवडणूक प्रशासन जनजागृती करत आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल करताना घ्यावयाची काळजी, छाननी, निवडणूक खर्चावरील मर्यादा आदींचे पालन करावे. त्याबाबत सर्व सूचना आयोगाच्या मार्गदर्शक पुस्तिकांमध्ये उपलब्ध आहेत, त्यानुसार कार्यवाही करावी, असे आवाहनही श्रीमती तेली-उगले यांनी केले.

यावेळी राजकीय पक्षांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन विभागीय आयुक्तांनी केले.

असा आहे निवडणूक कार्यक्रम:
निवडणुकीची अधिसूचना २९ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर, अर्जांची छाननी ७ ऑक्टोबर, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ ऑक्टोबर २०२६ आहे. मतदान २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत होईल. मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असून, निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी पूर्ण केली जाणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गणेशोत्सवात राबणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान

शनिपार मंडळ ट्रस्टतर्फे ५० स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गौरवपुणे : गणेशोत्सवाच्या...

दगडूशेठचा गणपती ‘श्री वक्रतुंड’ रथातून निघणार; दुपारी ४ वाजता बेलबाग चौकातून मिरवणुकीत सहभाग

१३४ व्या वर्षाची सांगता मिरवणूक थाटामाटात; प्रेम मंदिराच्या प्रतिकृतीवर...