छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–सावंतवाडी रोड दरम्यान नवीन नियमित  एक्स्प्रेस ट्रेन सुरु करण्यास मंजुरी

Date:

मुंबई-

महाराष्ट्र आणि कोकण विभागातील प्रवासी संपर्क सुविधेला  मोठी चालना देत भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) आणि सावंतवाडी रोड दरम्यान नवीन नियमित  एक्स्प्रेस रेल्वे सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. 510 किलोमीटरच्या या मार्गावर सुरू होणारी ही सेवा पर्यटन, शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि सामाजिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना थेट, सोयीस्कर आणि विश्वासार्ह रेल्वे सेवा  उपलब्ध करून देणार आहे.

ही प्रस्तावित रेल्वे गाडी दररोज गाडी क्रमांक 15087 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–सावंतवाडी रोड एक्स्प्रेस आणि  15088 सावंतवाडी रोड–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस म्हणून  धावणार आहे.

कोकण विभागात  व्यापक रेल्वे सेवा –

या नवीन दैनिक एक्स्प्रेसला पुढील स्थानकांवर व्यावसायिक थांबे असतील :

दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावरदा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, वळीवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.

या सेवेमुळे मुंबई महानगर प्रदेश आणि कोकणातील महत्त्वाची शहरे व जिल्हे यांच्यात अखंड रेल्वे संपर्क उपलब्ध होऊन कोकण किनारपट्टीपर्यंतची पोहोच अधिक सुलभ होणार आहे.

पर्यटन, अर्थव्यवस्था आणि प्रवासी सुविधांना चालना:

या नवीन सेवेच्या माध्यमातून मुंबई आणि दक्षिण कोकणमधील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार असून समुद्रकिनारे, किल्ले, मंदिरे आणि निसर्ग पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांचा प्रवास अधिक सुलभ होईल. तसेच दैनंदिन प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी, लघुउद्योजक आणि स्थानिक नागरिकांनाही मुंबई आणि कोकणदरम्यान आणखी एक थेट रेल्वे पर्याय उपलब्ध होणार आहे.

या रेल्वे सेवेच्या माध्यमातून प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना मिळेल, प्रवाशांची वाहतूक अधिक सुरळीत होईल आणि कोकण मार्गावरील वाढत्या रेल्वे प्रवासाच्या मागणीची प्रभावी पूर्तता होईल.

ही नवीन दैनिक एक्स्प्रेस सेवा प्रवासी संपर्काचा विस्तार, प्रवासातील सोयीसुविधा वाढविणे आणि अधिक सक्षम व सर्वसमावेशक रेल्वे जाळ्याद्वारे संतुलित प्रादेशिक विकासाला चालना देण्याच्या भारतीय रेल्वेच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान

लोकमान्य टिळकांचे विचार आजही राष्ट्राला दिशा देणारे; अजीत डोवाल...

विद्यार्थ्यांच्या रक्ताने माखलेल्या हातांनी लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यास शहर काँग्रेसचा विरोध.

पुणे-   दिल्ली येथील जतंर-मंतर मध्ये झालेले विद्यार्थ्यांचे आंदोलन...

जलतरंग वादनाचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न : पंडित मिलिंद तुळाणकर

गानवर्धन, स्वरझंकार ज्ञानपीठ आयोजित मुक्त संगीत चर्चासत्र पुणे : जलतरंग...

मुंबई-टोरंटो दरम्यान एअर इंडियाची थेट विमानसेवा; २५ ऑक्टोबरपासून आठवड्यातून तीन उड्डाणे

दिल्ली-टोरंटो मार्गावर नवीन बोईंग ७८७-९ विमान; कॅनडा मार्गावरील प्रवासी...