बाँबे इंजिनिअर ग्रुप आणि केंद्र, खडकी येथे अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन

Date:

पुणे: बाँबे इंजिनिअर ग्रुप आणि केंद्र (बीईजी), खडकी येथे युनिट मुख्यालय कोटा अंतर्गत अग्निवीर (जनरल ड्युटी), अग्निवीर (टेक्निकल), अग्निवीर (ट्रेड्समन – १० वी व ८ वी उत्तीर्ण) तसेच अग्निवीर खेळाडू (खुला श्रेणी) या पदाकरिता अग्निवीर भरती मेळाव्याचे १० ते १२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.

भरती मेळाव्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे: ३१ जुलै २०२६ रोजी खेळाडूंची तपासणी करण्यात येणार आहे. १० ऑगस्ट रोजी अग्निवीर (सामान्य कर्तव्य) – मराठा प्रवर्ग, ११ ऑगस्ट रोजी अग्निवीर (सामान्य कर्तव्य) – शीख (मजहबी व रामदासी), एम अँड आर तसेच मुस्लिम प्रवर्ग, अग्निवीर (स्टोअर कीपर/ऑफिस असिस्टंट), अग्निवीर (ट्रेड्समन – ८ वी व १० वी उत्तीर्ण) आणि विविध सपोर्ट स्टाफ पदांसाठी भरती प्रक्रिया होईल. १२ ऑगस्ट रोजी अग्निवीर खेळाडू (खुला प्रवर्ग) भरती होणार आहे.

भरती प्रक्रियेदरम्यान पात्र उमेदवारांची प्रारंभिक तपासणी, शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, शारीरिक मापन, कागदपत्रांची पडताळणी व संगणक नोंदणी करण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांनी संबंधित दिवशी सकाळी 5 ते 8 या वेळेत नंदा गेट, बाँबे इंजिनिअर ग्रुप आणि केंद्र, खडकी येथे उपस्थित राहावे. सकाळी ८ नंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश दिला जाणार नाही. अग्निवीर खेळाडू (खुला वर्ग) भरतीसाठी फुटबॉल, पोहणे, हॉकी, ॲथलेटिक्स, व्हॉलीबॉल, रोईंग, बॉक्सिंग, कबड्डी, बास्केटबॉल, कुस्ती, हँडबॉल, ट्रायथलॉन, वेटलिफ्टिंग, जिम्नॅस्टिक्स आदी क्रीडा प्रकारांतील पात्र खेळाडूंना संधी उपलब्ध आहे.

या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती, पात्रता, सेवा अटी व इतर तपशीलांसाठी उमेदवारांनी www.bsakirkee.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर एस फिरासत (नि) पुणे यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बोगस पदवी रॅकेटचे धागेदोरे पुण्यातील भाजप नेत्यापर्यंत ? :आमदार रोहित पवार

विद्यापीठात भाजपच्या लोकांचा सुळसुळाट आणि डेटावर ताबा पुणे-सावित्रीबाई फुले पुणे...

डिजिटल नकाशांतून जलसमृद्धीकडे…!!

५७,८५८ सूक्ष्म पाणलोट नकाशांनी घडवले महाराष्ट्रातील जलनियोजनाचे नवे पर्व प्रधानमंत्री...

भाजप महाराष्ट्र प्रदेशच्या ‘दौरा समन्वयक – माध्यम विभाग’ पदी पत्रकार अमोल कविटकर यांची नियुक्ती

पुणे- भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या ‘दौरा समन्वयक –...