शालेय बस सुरक्षेसाठी सुधारित नियम लागू; तीन महिन्यांत अंमलबजावणी बंधनकारक

Date:

पुणे, दि. 27 : महाराष्ट्र शासन राजपत्रात १६ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र मोटार वाहन (शालेय बस नियमन) (प्रथम सुधारणा) नियम, २०२६ लागू करण्यात आले आहेत. सुधारित नियमानुसार मुंबई महानगर क्षेत्र वगळता राज्यातील इतर भागात शालेय बस व शालेय व्हॅनच्या परवान्यासाठी वाहनाची नोंदणी दिनांकापासूनची वयोमर्यादा (आयुष्यमान) १५ वर्षांवरून २० वर्षांपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच शालेय बसच्या शुल्काचे (दर) निर्धारण करण्याचे अधिकार संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांना प्रदान करण्यात आले आहेत.

तसेच सर्व शालेय बस व विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस विथ पॅनिक बटण, फायर डिटेक्शन अँड अलार्म सिस्टिम , सीसीटीव्ही कॅमेरे, डिजिटल सेफ्टी मॉनिटरिंग सिस्टिम, वाहनाचे थेट लोकेशन दर्शविणारी मोबाईल अॅप सुविधा, विद्यार्थ्यांच्या डिजिटल उपस्थितीची नोंद, पालकांना सूचना देणारी प्रणाली तसेच किमान ३० दिवसांचे सीसीटीव्ही रेकॉर्ड जतन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय वाहनातील सर्व आसनांना सीटबेल्ट असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे, दि. २७ : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेचे...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

शेतकरी बांधवानो, आपले सरकार सेवा केंद्रावरील आधार प्रमाणीकरण करुन...

माळशेजघाट मार्गे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पुर्णपणे बंद-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पुणे, दि. २७: कल्याण-माळशेज...