पोलिस बनून एक कोटींची रोकड लुटण्याचा प्रयत्न; नवले पुलाजवळ व्यवसायिकाला अडवून दरोड्याचा प्रयत्न

Date:

पुणे-मुंबई-बंगळूरु बाह्यवळण मार्गावरील नवले पुलाजवळ पोलिस असल्याची बतावणी करत एका व्यावसायिकाकडील एक कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी नऱ्हे पोलिसांनी पाच अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तळेगाव दाभाडे येथील ३५ वर्षीय व्यावसायिक सिंहगड रस्त्यावरून नऱ्हे भागातील एका बँकेकडे मोटारीतून निघाले होते. त्यांच्यासोबत मोटार चालक आणि अन्य एक व्यक्ती मोटारीत होते.

नवले पुलाजवळ वेगवेगळ्या दुचाकींवरून आलेल्या पाच चोरट्यांनी त्यांची मोटार अडवली. चोरट्यांनी स्वतःला पोलीस असल्याचे भासवून व्यावसायिकाची चौकशी सुरू केली. मोटारीतून बेकायदा मार्गाने मिळालेली मोठी रक्कम नेली जात असल्याचा आरोप करत चोरट्यांनी व्यावसायिकाकडील एक कोटी रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला.व्यावसायिकाने आरडाओरडा करत चोरट्यांना विरोध केला. त्यामुळे चोरटे दुचाकींवरून घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच नऱ्हे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नऱ्हे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांनीही घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी नवले पूल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध सुरू आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणेकरांचे ५६७ कोटी वाचवा,ओला-सुका कचऱ्यासाठी स्वतंत्र निविदा काढा

अरविंद तुकाराम शिंदे यांचा स्थायी समितीत ठराव; रामचंद्र ऊर्फ...

सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिवाजीनगर न्यायालयात वकिलांचे जोरदार आंदोलन

पुणे-लडाखचे पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारने पोलिसांच्या...

महापालिका प्रशासनात आता तरुणाईचा थेट सहभाग

नगरसेवक तेजिंदर सिंगतिवाना यांच्या 'महापौर Gen Next Civic Fellows'...

भांडूप पक्षी उद्यान प्रकल्पाला गती देत पर्यावरण संवर्धनासह इको-टुरिझमला चालना

मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड आशिष शेलार मुंबई, दि. २० :...