डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी शिवसेनेच्या राष्ट्रीय सचिव शायना एन. सी. व श्रेया योगेश कदम यांची सदिच्छा भेट

Date:

पुणे.दि१९: शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील सिल्व्हर रॉक्स निवासस्थानी आज शिवसेनेच्या राष्ट्रीय सचिव व प्रवक्त्या श्रीमती. शायना एन. सी. तसेच श्रीमती. श्रेया योगेश कदम यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला.

या भेटीदरम्यान शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीकरणाबाबत सविस्तर चर्चा झाली. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन आणि पक्षविस्ताराच्या दृष्टीने पुढील वाटचाल यावर सकारात्मक विचारविनिमय करण्यात आला.

याशिवाय पुणे शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी सामाजिक संस्थांचा सहभाग वाढविण्याची आवश्यकता, तसेच शहरातील बंद पडलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पांचा समाजोपयोगी पद्धतीने वापर करण्याबाबतही चर्चा झाली. पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये स्वयंसेवी संस्थांची भूमिका अधिक सक्षम करण्यासंदर्भात विविध सूचना यावेळी मांडण्यात आल्या.

या प्रसंगी राष्ट्रीय सचिव व प्रवक्त्या श्रीमती. शायना एन. सी., श्रीमती श्रेया योगेश कदम, श्रीमती पूजा रावेतकर, श्रीमती कांताताई पांढरे, श्रीमती रंजना कुलकर्णी, श्रीमती सोनाली लांडगे, श्रीमती भारती जोशी, श्री. महेंद्र जोशी, जायंट्स संस्थेचे डॉ. श्री. कैलास बवले, श्री. गणेश शिरोडे आणि श्री. धनंजय लोखंडे उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भांडूप पक्षी उद्यान प्रकल्पाला गती देत पर्यावरण संवर्धनासह इको-टुरिझमला चालना

मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड आशिष शेलार मुंबई, दि. २० :...

हडपसर परिसरात पुणे महापालिकेची अनधिकृत बांधकामांवर कारवाई

पुणे, दि. २० जुलै : पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण/अनधिकृत...

श्री श्री जगन्नाथ रथयात्रा सोहळा पुण्यात जल्लोषात साजरा

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ - इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे आयोजन ;...