धरणातील पाणीपातळी घटल्याने खडकवासला धरणाचा विसर्ग कमी; मुठा नदीत आता १८,२७१ क्युसेक्स पाणी

Date:

नागरिकांनी नदीपात्रापासून दूर राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे, दि. ८ जुलै : खडकवासला धरणातील पाणीपातळीमध्ये झपाट्याने होत असलेल्या घटेमुळे धरणाच्या सांडव्यावरील विसर्ग कमी करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. त्यानुसार बुधवारी (८ जुलै) दुपारी १२.३० वाजल्यापासून मुठा नदीपात्रातील विसर्ग २७,२०३ क्युसेक्सवरून १८,२७१ क्युसेक्सपर्यंत कमी करण्यात आला आहे.

खडकवासला पाटबंधारे विभागाने जारी केलेल्या सूचनेनुसार, पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार विसर्गात पुन्हा वाढ अथवा घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनाने नागरिकांना मुठा नदीपात्रात उतरू नये, तसेच नदीपात्रात किंवा काठावर ठेवलेले साहित्य, जनावरे अथवा इतर वस्तू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असे आवाहन केले आहे. सखल भागातील नागरिकांना सतर्क करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनालाही देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या खडकवासला धरण समूहाच्या आकडेवारीनुसार, चारही धरणांमध्ये एकूण १४.९५ टीएमसी (५१.३० टक्के) पाणीसाठा असून, मागील वर्षी याच दिवशी हा साठा १९.५५ टीएमसी (६७.०८ टक्के) इतका होता.

खडकवासला धरण समूह (दि. ८ जुलै २०२६, सायं. ५.००)
धरणपाणीसाठाटक्केवारी
खडकवासला१.८३ टीएमसी९२.६१%
पानशेत५.६५ टीएमसी५३.०४%
वरसगाव६.२६ टीएमसी४८.८२%
टेमघर१.२२ टीएमसी३२.८२%

एकूण पाणीसाठा : १४.९५ टीएमसी (५१.३०%)
एकूण आवक : १४३१ एमसीएफटी

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

१५ जुलैपासून ब्रिटिश व्हिस्की, कोट्यातील कारसह काही आयातींवरील शुल्क घटणार

भारतीय वस्त्रोद्योग, चामडे, रत्न-दागिने, औषधे आणि अभियांत्रिकी उत्पादनांना ब्रिटनच्या...

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर पर्यटकांना लुटणारे पोलिस गजाआड

'ड्रग्ज'ची भीती दाखवून मागितली 5 लाखांची खंडणीपुणे-पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण...

पुण्यात कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता, 10 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

पुणे--पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपोमध्ये बुधवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली....