पालखी सोहळ्यामुळे पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल; मध्यवर्ती भागात जाणे टाळा,पर्यायी मार्गांचा वापर कराअतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांचे पुणेकरांना आवाहन;

Date:

  • पालखी मुक्कामाच्या काळात वाहतूक नियोजनात बदल

पुणे | संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. पालखी सोहळ्यादरम्यान शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर वारकरी आणि भाविकांची गर्दी होणार असल्याने नागरिकांनी शक्यतो मध्यवर्ती भागात जाणे टाळावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी केले आहे.पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी शहरातील वाहतुकीचे नियोजन केले आहे. पालखी शहरात दाखल झाल्यानंतर दोन्ही पालख्यांचा मुक्काम नाना पेठ आणि भवानी पेठ परिसरात असणार आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे.मनोज पाटील यांनी सांगितले की, पालखी सोहळ्याच्या कालावधीत नागरिकांनी अत्यावश्यक काम नसल्यास शहराच्या मध्यवर्ती भागात येणे टाळावे. शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाणाऱ्या वाहनचालकांनी मध्यवर्ती भागातून जाण्याऐवजी बाहेरील पर्यायी मार्गांचा वापर करावा.नगर रोड आणि सोलापूर रोडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी खराडी बायपास मार्गाचा वापर करावा.सातारा रोडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी कात्रज–कोंढवा मार्गाचा वापर करावा.तसेच मुंबईकडून येणाऱ्या आणि नगर रोडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी शहराच्या मध्यवर्ती भागात प्रवेश न करता पर्यायी मार्गांचा वापर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.पालखी मुक्कामाच्या परिसरात वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्यामुळे नाना पेठ, भवानी पेठ आणि लगतच्या परिसरातील वाहतुकीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक पोलिसांनी केलेल्या नियोजनाला सहकार्य करावे आणि शक्यतो पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.पालखी सोहळा निर्विघ्न पार पडावा, वारकऱ्यांची सुरक्षितता कायम राहावी आणि शहरातील वाहतुकीवरील ताण कमी व्हावा यासाठी पुणे पोलिसांकडून वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे.दरम्यान, पालखी सोहळ्यामुळे कोणत्या भागातील वाहतुकीवर परिणाम होणार आहे आणि वाहनचालकांनी कोणते पर्यायी मार्ग वापरावेत, याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी व्हिडिओद्वारे दिली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आयटी’ क्षेत्रातील मनुष्य बळाच्या समस्यां बाबत,’व्हाइट टी शर्ट रीव्होल्युशन’चे राज्यव्यापी ‘सर्वेक्षण अभियान’..!

डीजीटल युगांत 'कार्पोरेट कर्मचाऱ्यांच्या समस्या' देशाच्या उत्पादकतेशी संबंधित… गोपाळदादा...

लॉरेन्स बिश्नोई गँगवर FBI ची धडक :अमेरिका-कॅनडासह अनेक देशांमध्ये 50 ठिकाणी छापे टाकून 24 जणांची धरपकड, पुण्यातही 4 पकडले

अमेरिकेच्या तपास यंत्रणा एफबीआयने (FBI) पहिल्यांदाच गँगस्टर लॉरेन्स, गोल्डी...

कोयना धरणात सर्वाधिक ३६.८८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा

कृष्णा खोऱ्यात पावसाची दमदार हजेरी; धोम बलकवडीत १६८ मिमी,...

36 तासांत 18 इंच पाऊस, अर्धे सुरत बुडाले

गुरुग्राममध्ये 10km वाहतूक कोंडी, राजस्थानमध्ये 3 लोकांवर वीज कोसळली;...