आषाढी वारीत महावितरणकडून विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या

Date:

संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांचे निर्देश

पुणे, दि. ५ जुलै २०२६: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान अवघ्या काही दिवसांवर आले आहे. या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या संपूर्ण पालखी मार्ग, विसाव्याची ठिकाणे आणि मुक्कामाच्या स्थळांवर चोख विद्युत सुरक्षा ठेवण्यासाठी महावितरणचे संचालक (संचालन) श्री. धनंजय औंढेकर यांनी शनिवारी (दि. ४) आयोजित बैठकीत विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला.

आषाढी वारीमध्ये विद्युत सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड किंवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण पालखी मार्गाचे पुन्हा एकदा ‘वॉक डाऊन’ सर्वेक्षण करावे आणि विद्युत सुरक्षेचे ‘ऑडिट’ पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश श्री. औंढेकर यांनी दिले.

गणेशखिंड येथील ‘प्रकाशभवन’ सभागृहात आयोजित पुणे परिमंडलाच्या या आढावा बैठकीला मुख्य अभियंता (वितरण) अंकुर कावळे, पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे, अधीक्षक अभियंते ज्ञानदेव पडळकर, सिंहाजीराव गायकवाड, सुरेश सवाईराम, संजय वाघमारे यांच्यासह सर्व कार्यकारी व उपविभागीय अभियंते उपस्थित होते.

संचालक श्री. धनंजय औंढेकर म्हणाले की, आषाढी वारीमध्ये लाखो वारकरी पायी चालतात आणि माऊलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होते. अशा वेळी पालखी सोहळ्याचा मार्ग, विसावा आणि मुक्कामाची ठिकाणे येथे वीज यंत्रणा पूर्णपणे सुरक्षित असणे गरजेचे आहे. महावितरणसाठी ही केवळ एक जबाबदारी नसून ‘माऊलींची सेवा’ करण्याची मोठी संधी आहे. यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या सर्व रोहित्रांना सुरक्षिततेच्या दृष्टीने शॉक प्रूफ एफआरपी कुंपण घालण्यात यावे. तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या वीजवाहिन्यांची उंची वाढवून, त्यांच्या खाली योग्य ‘गार्डिंग’ची (सुरक्षा जाळी) व्यवस्था करावी. मुक्कामाच्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत वीज खंडित होऊ नये म्हणून पर्यायी वीजपुरवठ्याची यंत्रणा आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी वीज यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश त्यांनी दिले.

सुरळीत वीजपुरवठ्यात हयगय झाल्यास थेट कारवाई

पुणे परिमंडलातील गेल्या तीन महिन्यांतील वीजपुरवठ्याचा आढावा घेताना काही भागांत दीर्घकाळ वीज खंडित झाल्याच्या प्रकारांवर संचालक श्री. औंढेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित अभियंत्यांना कडक शब्दांत ‘अल्टिमेटम’ देत ते म्हणाले की, वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप तर होतोच, शिवाय महावितरणचा लाखो रुपयांचा महसूलही बुडतो. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी या बैठकीत मार्गदर्शनही केले. मात्र यापुढे वीजपुरवठा खंडित होण्यामागे जर कोणत्याही अधिकाऱ्याची किंवा कर्मचाऱ्याची हयगय आढळली, तर ती अजिबात सहन केली जाणार नाही आणि संबंधितांवर थेट कारवाई करण्यात येईल, असा थेट इशारा त्यांनी दिला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात 19 ते 21 जुलै दरम्यान 241 वा श्री वरदेंद्र तीर्थ स्वामीजी आराधना महोत्सव.

पुणे : सदाशिव पेठ येथील नंजनगूड श्री वरदेंद्र राघवेंद्र...

देशभर पावसाचा कहर; वसईत रस्त्याला नदीचे रूप, २० कार पाण्याखाली

गुजरातमध्ये कॉलनीत चालली बोट; १३ राज्यांना मुसळधार पाऊस आणि...