मुंबई,दि.७ : रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या मराठवाडा उपकेंद्राच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी सांगितले.
रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या विविध विषयाबाबत आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
रसायन तंत्रज्ञान संस्थेचे मराठवाडा येथे सन २०१८ मध्ये उपकेंद्र सुरु करण्यात आले. उपकेंद्राचे बांधकाम सुरु झाले असून ते पूर्ण करण्याकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल .तसेच जालना येथील उपकेंद्राच्या पदनिर्मितीस मान्यता आणि मूल्यनिर्धारण अहवालानुसार संस्थेस देय असलेली वेतन अनुदानाची रक्कम देण्यासंदर्भातही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.