पुणे (प्रतिनिधी) – राज्यातील सर्व ओबीसी संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय ओबीसी ऐक्य महापरिषदेचे दि. 7 ऑगस्ट 2023 सोमवार रोजी सकाळी 11 वाजता सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे.ओबीसी ऐक्य महापरिषदेचे उद्घाटन विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसीचे नेते कल्याणराव दळे तर स्वागत अध्यक्ष म्हणून लेखक तथा साहित्यीक श्रावण देवरे हे राहणार आहेत. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शन म्हणून ओबीसीचे नेते ॲड. अण्णाराव पाटील, साहित्यीक प्रल्हाद लुलेकर, माजी आ. ॲड. रामराव वडकुते, प्रख्यात विचारवंत प्रा. सुशिला मोराळे, शेतकरी नेते लक्ष्मण वडले, ओबीसी नेते एकबाल अंसारी, शब्बीर अंसारी, संजय विभुते, देवराव सोनटक्के, नविनचंद्र बांधीवडीकर, प्रा. प्रभाकर गायकवाड, सतिश दादा दरेकर, भगवान श्रीमंदिलकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या ओबीसी ऐक्य महापरिषदेत मंडल आयोगाच्या शिफारसिंची तंतोतंत आणि प्रभावीपणे अंमलबजावणी न केल्याने ओबीसीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. संविधानिक कलम 340 नुसार ओबीसींना देशातील प्रत्येक क्षेत्रात संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी ओबीसींची जात निहाय जनगणना होणे ही काळाची गरज आहे. देशातील प्रत्येक क्षेत्रात कंत्राटी पध्दतीने नोकरभरती करून खाजगीकरणाच्या माध्यमातून ओबीसींचे संविधानिक आरक्षण नष्ट करणे. शासक जातीचे एक भयानक षडयंत्र आहे. लोकशाही असलेल्या देशात खऱ्या अर्थाने बहुसंख्य समाज हा सत्ताधीश व शासक वर्ग असतो. परंतू भारत देशात मात्र ओबीसींची संख्या जवळपास साठ टक्के पेक्षा जास्त असतांनाही तो सत्ताधीश का नाही? यावरील सविस्तर कारणमिमासा व उपययोजना ओबीसींना लागू असलेली क्रिमीलेअरची असंविधानिक अट रद्द केल्याशिवाय मंडळ आयोगाचा हेतू साद्य होणार नाही, ओबीसींचे धार्मिक धुव्रिकरण करून राजकीय फायद्यासाठी मुस्लीमांच्या विरोधात केवळ वापर होत आहे हे ओबीसींनी तत्परतेने घेणे ही काळाची गरज आहे आदी विषयांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.या परिषदेचे निमंत्रक म्हणून सोमनाथ शेळके, सतिष दरेकर, संग्राम माने, प्रतापराव गुरव, आनंदा कुंदळे, हासिक नद्दाक असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन दिनकर चौधरी, विद्यानंद मानकर, संगीता खाडे, महेश भागवत, किशोर गुरव, अशोक मगर, निळखंट गुरव, प्रा. राजेंद्र गुरव, सुवर्णा सुर्वे, दत्तात्रय चेचर, संग्राम माने, प्रा. बी. आर. माळी, दामोधर बिडवे, अस्लम बागवान, किशोर सुर्यवंशी, वैशालीताई पवार, ॲड. सतिष कांबळे, संजय परदेशी, सुरेश पवार, संतोष साळुंके, रमेश राऊत, शंकरराव रायकर, वंदना कुमावत, प्रकाश गुरव, गणेश वाळुजकर, सुनिल वाळुजकर, महेंद्र गायकवाड, बाळकृष्ण भांबरे आदींनी केले आहे.