मुंबई – बँक ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष २४ च्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीचा नफा आर्थिक वर्ष २३ च्या पहिल्या तिमाहीतील ५६१ कोटी रुपयांवर वार्षिक पातळीवर १७६ टक्क्यांनी वाढून १५५१ कोटी रुपयांवर गेला आहे. कंपनीचा ऑपरेटिंग नफा आर्थिक वर्ष २३ च्या पहिल्या तिमाहीतील २१८३ कोटी रुपयांवरून वार्षिक पातळीवर ७२ टक्क्यांनी वाढून ३७५२ कोटी रुपयांवर गेला आहे.
असेट क्वालिटीच्या बाबतीत जीएनपीए गुणोत्तर वार्षिक पातळीवर २६३ बीपीएसने आहे, तर निव्वळ एनपीए गुणोत्तर वार्षिक पातळीवर ५६ बीपीएसने कमी झाले आहे.
जागतिक व्यवसायाने १२ लाख रुपयांचा टप्पा पार केला असून त्यात ८.६१ टक्क्यांची वाढ झाली आहे. जागतिक ठेवी वार्षिक पातळीवर ८.७१ टक्क्यांनी वाढल्या आहेत. एकूण कर्ज वार्षिक पातळीवर ८.४८ टक्क्यांनी वाढले आहे.
निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) आर्थिक वर्ष २३ च्या पहिल्या तिमाहीतील ४०७२ कोटी रुपयांवरून वार्षिक पातळीवर ४५ टक्क्यांनी वाढून ५९१५ कोटी रुपयांवर गेले आहे. बिनव्याजी उत्पन्न आर्थिक वर्ष २३ च्या पहिल्या तिमाहीतील ११५२ कोटी रुपयांवरून वार्षिक पातळीवर २७ टक्क्यांनी वाढून १४६२ कोटी रुपयांवर गेले आहे.
देशांतर्गत ठेवी वार्षिक पातळीवर ७.९८ टक्क्यांनी वाढून जून २३ मध्ये ५,८९,५१७ कोटी रुपयांवर गेल्या आहेत. देशांतर्गत कासा वार्षिक पातळीवर ७.५६ टक्क्यांनी वाढून जून २३ मध्ये २,६०,६१५ कोटी रुपयांवर गेला आहे, तर कासा गुणोत्तर ४४.५२ टक्क्यांवर गेले आहे.
आरएएम कर्ज वार्षिक पातळीवर ११.७५ टक्क्यांनी वाढून २,३९,९५४ कोटी रुपयांवर गेले असून जून २३ मधील कर्जात त्याचा वाटा ५५.३९ टक्के आहे.
मार्च २३ मधील १६.२८ टक्क्यांच्या तुलनेत बँकेचा एकूण कॅपिटल अडिक्वेसी रेशिओ (सीआरएआर) ३० जून २०२३ रोजी १५.६० टक्क्यांवर गेला. सीईटी-१ गुणोत्तर मार्च २३ मधील १३.६० टक्क्यांच्या तुलनेत जून २३ मध्ये १३.०२ टक्क्यांवर गेला.
बँकेने पूर्णपणे डिजिटल उत्पादनांची निर्मिती सुरू केली आहे. त्यात ठेवींच्या बाबतीत एसबी खाती, तर कर्ज विभागात मुद्रा/केसीसी/वैयक्तिक कर्ज/निवृत्ती कर्ज इत्यादींचा समावेश आहे. ग्राहकांना शाखेला भेट न देताही एसबी खाते सुरू करता येईल आणि कर्जही मिळवता येईल. बँकेने या आर्थिक वर्षाच्या अखेरीस डिजिटल उत्पादनांच्या माध्यमातून १०,००० कोटी रुपयांचा व्यवसाय मिळवण्याचे ध्येय ठेवले आहे.
३० जून २३ रोजी बँकेकडे ५१२९ देशांतर्गत शाखा आहेत. त्यात ग्रामीण – १८५२ (३६ टक्के), निम- शहरी १४५६ (२८ टक्के), शहरी – ८२९ (१६ टक्के) आणि मेट्रो – ९९२ (१९ टक्के) यांचा समावेश आहे.

