स्थायी समितीचे  अध्यक्ष म्हणून रासनेंनी काय कामे केली ?- खासदार वंदना चव्हाण यांचा सवाल

Date:

                                      –

पुणे- एखादा नगरसेवक  एकदा‌ महापालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष झाल्यावर आपल्या मतदार संघाचा कायापालट करतात. मात्र, भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने‌ यांनी चार वेळा स्थायी‌ समितीचे अध्यक्ष होऊनही मतदार संघात काहीच कामे केली नाहीत. आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात काय काम केली, हे मतदारांसमोर मांडावे, असे आव्हान राज्यसभेच्या खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी केले.

            कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुक महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ रविवारी काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अॅड. वंदना चव्हाण बोलत होत्या. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी उपस्थित होते.

            अॅड. वंदना चव्हाण म्हणाल्या, महाविकास आघाडेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी नगरसेवक म्हणून चांगले काम केले आहे. ते तत्परतेने काम करणारे व सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारे लोकप्रतिनिधी म्हणून परिचीत आहेत. या उलट भाजचा उमेदवार आहे. त्यांचे उमेदवाराने चार वर्ष महापालिकेच्या‌ स्थायी समितीमध्ये काम केले आहे, त्यातील तीन वर्ष ते स्थायीचे सदस्य होते. या कालावधीत त्यांनी मतदार संघासाठी काहीच काम केले नाही. एक वर्ष अध्यक्षपद मिळाल्यावर अनेकजण कामाची चुणूक दाखवतात, मात्र रासनेंना चार वर्षात काही करता आले नाही. त्यांनी काय काम केले, असा प्रश्न नागरुकांना पडला आहे.

            दुसरीकडे सत्तेवर आल्यावर भाजपने स्मार्ट सिटीची फसवी योजना आणली. या‌ योजनेसाठी आमच्या नगरसेवकाने कामे केलेला बाणेरचा परिसर निवडला. स्मार्ट सिटीसाठी स्वारगेट किंवा स्टेशनचा परिसर निवडला असता तर स्मार्ट सिटीने काय काम केले, हे लोकांसमोर आले असते. मात्र आमच्या‌ कामावर चमकोगिरी केली. तशाच प्रकारे नागरिकांना फसविणारी स्वच्छ भारत योजनाही भाजपने आणली. योजनेसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात, मात्र सर्वत्र कचरा तसाच दिसतो. 

            या‌सर्व गोष्टींवर महापालिकेतील सत्ताधारी म्हणून महापौर व स्थायी‌ समितीच्या अध्यक्षांनी प्रशासनावर वचक ठेवायला हवा. मात्र तसे झाले नाही. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या काळात जेएनएनयु मधून शहरातील अनेक कामे झाली.

            महापालिकेतील सत्ताधारी भाजपने शहरातील आरक्षित जागा गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला, मात्र आम्ही तो प्रयत्न हाणून पाडला. भाजपच्या‌ सत्ताकाळात महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळांची, ऐतिहासिक वास्तू व ठिकाणांचीही दुरावस्था झाली आहे. सार्वजनिक वाहतुकीचाही बोजवारा उडाला आहे. भाजपने मिळकतकराची ४० टक्के सूट काढून घेतली.

            भाजपने आणलेला नदी सुशोभीकरण प्रकल्प कसबा विधानसभा मतदार संघासाठी घातक आहे. राडारोड्यामुळे नदीची वहनक्षमता कमी झाली आहे. त्यात आता या प्रकल्पामुळे वहनक्षमता आणखी कमी होणार आहे. महापौर व स्थायीच्या अध्यक्षांनी पुणेकरांचे हित पाहण्यापेक्षा वरिष्ठांची मरजी राखण्यास धन्यता मानली. त्यामुळे धंगेकर यांचा या निवडणुकीत विजय निश्चित आहे.

            मेट्रो प्रकल्पाच्या बाजूला ४ एफएसआय देण्याचा निर्णय घेतला आहे. कसब्यात सर्वाधीक दाटीवाटीची घरे आहेत, मग येथे ४ एफएसआय कसा देणार, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. कोवीड काळात अजित दादांनी पालकमंत्री म्हणून चोख जबाबदारी पार पाडली. मात्र महापौर व स्थीच्या अध्यक्षांनी मनमाणी पद्धतीने काम केले, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही.

            भाजप नेते ही पोटनिवडणुक स्थानिक प्रश्नावर लढवण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर मते मागत आहे. मात्र पुणेकरांच्या बचावासाठी येणार नाहीत, त्यामुळे पुणेकरांनीच आपला विचार करून मतदान करणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीवेळी १५ लाख खात्यात येणार, कोट्यावधी नोकऱ्या‌यावर नागरिकांची फसवणुक झाली आहे, हे विसरता कामा नये. मोदी‌ यांचा करिष्मा आता राहिलेला नाही, त्यामुळे या पोट निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर प्रचंड मताने विजयी होणार आहेत, असा विश्वासही अॅड. वंदना चव्हाण यांनी व्यक्त केसा.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....