ओदीशामध्ये रेल्वे अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“ओदीशात झालेल्या रेल्वे अपघातामुळे व्यथित झालो. या दुःखद प्रसंगी शोकाकुल कुटुंबियांबद्दल शोकसंवेदना. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी. रेल्वेमंत्री @AshwiniVaishnaw यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटनेच्या ठिकाणी बचावकार्य सुरू असून अपघातग्रस्तांना सर्वोतोपरी मदत केली जात आहे.
गोव्यातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसचे शनिवारी होणारे लॉंचिंग रद्द करण्यात आले आहे. पीएम मोदी हिरवा झेंडा दाखवणार होते. ओडिशा रेल्वे अपघातानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
या कार्यक्रमात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मडगाव स्थानकावर येणार होते. मात्र त्यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. ओडिशात शनिवारी सकाळी रेल्वे मंत्री रेल्वे अपघाताच्या ठिकाणी पोहोचले.
सध्या महाराष्ट्रात 16 डब्यांच्या वंदे भारत गाड्या सीएसएमटी मुंबई-साईनगर शिर्डी, सीएसएमटी-सोलापूर आणि मुंबई सेंट्रल-अहमदाबाद मार्गावर धावत आहेत. दुसरी ट्रेन नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावणार आहे. पुढील आठवड्यापासून वंदे भारत गोवा मार्गावर नियमित धावण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार ही ट्रेन शुक्रवार वगळता आठवड्याचे उर्वरित सहा दिवस धावणार आहे.
वंदे भारत ट्रेनला गोवा-मुंबई मार्गावर 7 थांबे देण्यात आले आहेत. सीएसएमटी, दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, रत्नागिरी, कणकवली, थिविम आणि मडगाव स्थानकांवर थांबे असतील. यापूर्वी 16 मे रोजी सीएसएमटी ते मडगाव दरम्यानच्या ट्रायल रनदरम्यान ट्रेनने सुमारे सात तासांत हे अंतर कापले होते.
तिकिटांची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही, परंतु एका तिकिटाची किंमत सुमारे 1400 रुपये असेल अशी अपेक्षा आहे. ट्रेनच्या वेगवेगळ्या श्रेणीनुसार तिकीट दरात बदल होऊ शकतो.
जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क भारताकडे आहे. येथे 1.25 लाख किलोमीटर लांबीच्या रेल्वे ट्रॅकवर दररोज 11 हजारहून अधिक ट्रेन धावतात. या गाड्यांमधून दररोज सुमारे 3 कोटी लोक प्रवास करतात. इतका मोठा आणि लोकांशी जोडलेला असल्यामुळे भारतात रेल्वेसाठी वेगळा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. 2016 मध्ये मोदी सरकारने ही 92 वर्षे जुनी प्रथा बंद केली.