क्यूब हायवेज ट्रस्टची भारतात नोंदणी

Date:

पुणे १९ एप्रिल २०२३ – कॅनेडियन पेन्शन इनव्हेस्टमेंट मॅनेजर ब्रिटिश कोलंबिया इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन (बीसीआय) आणि अबू धाबीचे सॉवरिन गुंतवणूकदार मुबादला इनव्हेस्टमेंट कंपनी (मुबादला) आता भारतातील क्यूब हायवेज ट्रस्ट (सीएचटी) या इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट ट्रस्टचे (इनव्हीट) नवे अँकर गुंतवणुकदार झाले आहेत. 

क्यूब हायवे फंड अडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेड या इनव्हीट गुंतवणूक व्यवस्थापक कंपनीने आपल्या संपूर्ण मालकीच्या कंपनीची ऑर्डिनरी युनिट्स खासगीरीत्या ५२,२५८.२७ दशलक्ष रुपयांना (C$ ६३० दशलक्ष डॉलर्स) ठेवत नोंदणी जाहीर केली आहे. इनव्हीटमध्ये  १८ टोल आणि वार्षिक पातळीवर निश्चित रक्कम देणाऱ्या एकूण १,४२३.६० किलोमीटर्स रस्ते मालमत्तेचा समावेश असलेला वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ आहे. बीसीआय, मुबादला आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणुकदारांनी ऑर्डिनरी युनिट्सला सबस्क्राइब केले आहे. 

इनव्हीटमध्ये  असलेल्या मालमत्तेच्या पहिल्या टप्प्यात १७ एनएचएआय टोल रस्ता मालमत्ता आणि एक एनएचएआय वार्षिक रक्कम देणाऱ्या रस्ते मालमत्तेचा समावेश आहे. ही रस्ते मालमत्ता ११ राज्यांत वसलेली असून त्यात आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, राजस्थान, तमिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे. त्याशिवाय पहिला प्रस्ताव देण्याच्या अधिकाराअंतर्गत सीएचटीला सात हायवे मालमत्तेची पाइपलाइन उपलब्ध होण्याची संधी मिळू शकते.

क्यूब हायवेज फंड्स अडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेडचे स्वतंत्र संचालक श्री. यु के सिन्हा (इनव्हीटचे गुंतवणूक व्यवस्थापक म्हणून काम करणारे) म्हणाले, ‘ही भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्राच्या विकासातली विशेषतः आयएनव्हीआयटीसाठीची अतिशय महत्त्वाची घटना आहे. अशा प्रतिष्ठित गुंतवणुकदारांनी क्यूबमध्ये विश्वास दाखवल्याने कंपनी व तिच्या कर्मचाऱ्यांच्या क्षमतेला पावती मिळाली आहे. संचालक मंडळ आणि क्यूबचा कर्मचारी वर्ग भागधारकांबरोबर काम करून मूल्यनिर्मिती करत राहाण्यासाठी उत्सुक आहे. अधिक समृद्ध आणि शाश्वत भविष्याकडे होत असलेल्या क्यूबच्या वाटचालीत सहभागी होण्यासाठी मी उत्सुक आहे.’

इनव्हीटने स्टेट बँक ऑफ इंडिया सह १०० अब्ज रुपयांचा (C$ १.२ अब्ज) सुविधा करार केला असून ही रक्कम प्राथमिक पोर्टफोलिओमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या कर्जाच्या पुनर्वित्तासाठी वापरली जाणार आहे.

इनव्हीटला त्यांच्या कर्ज सुविधांसाठी तीन रेटिंग एजन्सीजद्वारे ‘प्रोव्हिजनल आयएनडी आयआयए/स्टेबल’ रेटिंग देण्यात आले असून या एजन्सीजमध्ये क्रिसिल रेटिंग्ज लिमिटेड, इक्रा लिमिटेड आणि इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिडेट यांचा समावेश आहे. पोर्टफोलिओचे ट्रॅक रेकॉर्ड, रोख जमा करण्याची रचना (कॅश पुलिंग स्ट्रक्चर), भौगोलिक वैविध्यता, डेट संरक्षक उपाययोजना आणि अनुभवी व्यवस्थापन टीम यांची दखल घेत हे रेटिंग देण्यात आले आहे. 

बीसीआयमधील इन्फ्रास्ट्रक्चर अँड रिन्यूएबल रिसोर्सेस विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक झमन वेलजी म्हणाले, ‘बीसीआयची क्यूब हायवेमध्ये करण्यात आलेली गुंतवणूक ही कंपनी सेवा देत असलेल्या समाजाच्या मूलभूत गरजा पूर्ण करणाऱ्या पायाभूत सुविधा प्लॅटफॉर्म्समध्ये गुंतवणूक करण्याच्या दीर्घकालीन धोरणाशी सुसंगत आहे. त्याशिवाय या गुंतवणुकीमुळे पायाभूत सुविधा क्षेत्र आणि भारतातील आमची गुंतवणूक तसेच कामकाज विस्तारण्यास मदत होतील व पर्यायाने भारताच्या आर्थिक विकासाला हातभार लावणे बीसीआयला शक्य होईल. सार्वजनिक क्षेत्रातील ग्राहकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्मिती करण्यासाठी क्यूब हायवेजसह काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’

मुबादलाच्या पारंपरिक पायाभूत सुविधा विभागाचे कार्यकारी संचालक सईद अरार म्हणाले, ‘रस्ते क्षेत्रात भारतात विकासाच्या  विलक्षण संधी उपलब्ध आहेत तसेच इथे पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी चांगले नियमन केलेली बाजारपेठ अस्तित्वात आहे. १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम रस्ते बांधकाम उपक्रमासाठी आणि २० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निधी आगामी संपादनासाठी ठेवणारी क्यूब हायवेज हा मुबादलासाठी रस्ते क्षेत्रात गुंतवणूक करून या बाजारपेठेतील संधींचा लाभ घेण्यासाठी अगदी योग्य प्लॅटफॉर्म आहे. जबाबदार गुंतवणूकदार या नात्याने आम्हाला क्यूब हायवेजसह काम करताना आणि भारताच्या रस्ते पायाभूत सुविधा क्षेत्राच्या महत्त्वाकांक्षांना पाठिंबा देत देशाला सामाजिक- आर्थिक लाभ मिळवून देताना आनंद होत आहे.’

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची लंडनमध्ये उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांच्याशी भेट

यूके अभ्यासदौऱ्यात महत्त्वपूर्ण चर्चा मुंबई, दि. १७ फेब्रुवारी २०२६ :...

कविता हाच माझा कर्मयोग : प्रभा सोनवणे

कै. तिलोत्तमा निफाडकर स्मृती कर्मयोगिनी पुरस्काराने प्रभा सोनवणे यांचा गौरव पुणे :...

चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात यावा

आ सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल...

टीओडी वीजमीटरमुळे पुणेकरांना मिळाली साडेआठ कोटींची सवलत

पुणे, दि. १७ फेब्रुवारी २०२६- टीओडी वीजमीटर बसविणाऱ्या वीज ग्राहकांना...