पुणे-शालेय जीवनातच पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये परदेशातील उच्च शिक्षणाविषयी ध्येय निर्माण व्हावे, त्यांची उमेद वाढावी या हेतूने काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून राजीव गांधी ई लर्निंग स्कुलमधील इयत्ता सातवी ते दहावी मधील १०० विद्यार्थ्यांना पासपोर्टचे वितरण माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी देशात रोल मॉडेल ठरलेल्या आणि काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पुणे महागरपालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग स्कुलमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमासाठी मध्यंतरी परदेशी शिष्टमंडळाने आमंत्रण दिल्याने,त्यानुसार विद्यार्थ्यांचा पासपोर्ट काढण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी आयोजित पालकसभेत सुमारे पाचशे विद्यार्थ्यांना पासपोर्ट प्रदान करण्यात आला. यावेळी पालकांनी उत्स्फूर्त स्वागत करून आबा बागुल यांच्याप्रती आभारही व्यक्त केले.
यावेळी माजी प्रिन्सिपल अरुण कामठे, बालमानस शास्त्रज्ञ समुपदेशक प्रतिमा खांडेकर, प्रिन्सिपल रुपाली कदम, अश्विनी ताटे, शोभा शंकर , स्मिता वैद्य आदी उपस्थित होते.
यावेळी पुणे महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे नेते आबा बागुल म्हणाले की, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आर्थिक दुर्बल घटकांसह मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या ठरलेल्या देशातील पहिल्या राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलला नुकतेच ‘आयएसओ ९००१’ मानांकन प्राप्त झाले आहे आणि आज परदेशातील शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांमधील ध्येय निर्माण व्हावे, त्यांची उमेद वाढावी या हेतूही या पासपोर्टच्या माध्यमातून सफल झाला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी या शाळेने नावलौकिक प्राप्त केला आहे. सीबीएसई बोर्ड इयत्ता दहावीपर्यंत आणि राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीपर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. शाळेची स्थापना माझ्या पुढाकारातून झाली. स्थापनेपासून सलग शंभर टक्के निकालाची परंपरा राखण्यात यश मिळाले आहे.केवळ दहावी -बारावीमध्येच नाही तर आयआयटीमध्येही या शाळेतील विद्यार्थी टॉपर ठरले आहेत.आता शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे विद्यार्थ्यांचे स्वप्नही लवकरच पूर्णत्वास जाईल असा विश्वासही आबा बागुल यांनी व्यक्त केला. प्रारंभी विद्यार्थ्यांनी ताणतणावाला कसे जीवनातून हद्दपार करावे. दिनक्रम कसा असावा, पालकांच्या अपेक्षांचे ओझे, न्यूनगंड यावर बालमानस शास्त्रज्ञ समुपदेशक प्रतिमा खांडेकर यांनी समुपदेशन केले.