शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या सूचनेला डावलून टीकास्त्र
मुंबई-सावरकरांनी बलात्काराला विरोधकांविरुद्ध राजकीय हत्यार म्हणून वापरण्याचा आदेश दिला, ते बलात्कार हे राजकीय हत्यार आहे असे सांगत, असा दावा दावा माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी केला. त्यांनी तसा व्हिडिओही ट्विट केला आहे.शिवानी वडेट्टीवार या माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या आहेत. तर महाराष्ट्र यूथ काँग्रेसच्या सचिव म्हणून देखील त्या कार्यरत आहेत. चंद्रपूरच्या राजकारणात त्या अनेक वेळा दिसून येत आहे. वडील मंत्री असताना त्यांनी मतदारसंघात अनेक दौरे केल्याचे दिसून आले आहे.एकीकडे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची बदनामी सहन करणार नाही असे, उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या भर सभेत जाहीर केले होते. यात राहुल गांधींच्या पुढे जात शिवानी वडेट्टीवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीकास्त्र डागले आहे. उद्धव ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्याला,आणि पवारांनी केलेल्या सूचनेला देखील आपण मानत नाही, हेच काँग्रेस नेते दाखवून देत आहेत.
शिवानी यांच्या या विधानामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आता यावर सावकरप्रेमी आणि अभ्यासक काय भूमिका घेतात आणि कसे उत्तर देतात हे पाहावे लागेल.
शिवानी काय म्हणाल्या? फुले – शाहू – आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा दावा करणाऱ्या शिवानी वडेट्टीवार यांनी एका मेळाव्यात सावरकरांविषयी हे वक्तव्य केले. शिवसेना-भाजपने काढलेल्या सावरकर गौरव यात्रेच्या विरोधात बोलताना शिवानी वडेट्टीवार यांनी सावरकरांनी बलात्काराला विरोधकांविरुद्ध राजकीय हत्यार म्हणून वापरण्याचा आदेश दिला असल्याचा दावा केला आहे.
आम्हाला कसे सुरक्षित वाटेल?शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या की, शिवसेना-भाजप कधीच फुले – शाहू – आंबेडकर गौरव यात्रा काढणार नाही. ते फक्त सावरकरांचीच गौरव यात्रा काढतील, पण माझ्यासारख्या महिला भगिनीला त्यामुळे कसे सुरक्षित वाटेल? कारण सावरकरांनी आपल्या विरोधकांविरुद्ध बलात्कारासारख्या राजकीय हत्याराचा वापर करायचे आदेश दिले होते.