रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पत धोरणात प्रमुख व्याजदरात कोणताही बदल नाही

Date:

मुंबई, 6 एप्रिल 2023

रेपो दर पूर्वीप्रमाणेच 6.5% कायम ठेवण्यात येईल. परिणामी, स्थायी ठेव सुविधा दरात देखील काही बदल न करता तो सव्वा सहा टक्के इतका असेल. आणि मार्जीनल स्थायी सुविधा दर आणि बँक दर 6.75% असेल हा निर्णय  पतधोरण समितीने एकमताने घेतला आहे  अशी माहिती रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण अहवाल सादर करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली. द्वैमासिक पत धोरणाची माहिती आज रिझर्व्ह बँकेच्या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून देताना ते बोलत होते.

महागाईचा दर निर्धारित लक्ष्यापेक्षा अधिक आहे असे निरीक्षण नोंदवत गव्हर्नर दास म्हणाले की, सध्याचा महागाई दर लक्षात घेता, सध्याचे धोरणात्मक व्याजदर अजूनही परिस्थितीशी जुळवून घेणारे ठरतील. म्हणून, पतधोरण समितीने दरांवरील नियंत्रण काढून घेण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.

जागतिक पातळीवरील अस्थिरतेच्या काळात, आर्थिक व्यवहार संवेदनक्षम असतात याकडे निर्देश करून गव्हर्नर म्हणाले की, भारताचे वर्ष 2023-24 साठीचे वास्तव सकल देशांतर्गत उत्पादन 6.5% असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. यामध्ये पहिल्या तिमाहीत हा दर 7.8%, दुसऱ्या तिमाहीत 6.2%, तिसऱ्या तिमाहीत 6.1% आणि चौथ्या तिमाहीत हा दर 5.9% राहील असा अंदाज बांधण्यात आला होता.

वर्ष 2023-24 मध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर 5.2% राहील आणि तो पहिल्या तिमाहीत 5.1%, दुसऱ्या तिमाहीत 5.4%, तिसऱ्या तिमाहीत 5.4% तर चौथ्या तिमाहीत 5.2% असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे अशी माहिती दास यांनी दिली.

आज जाहीर  झालेल्या आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी खालील पाच अतिरिक्त उपाययोजनांची घोषणा केली:

देशात नॉन-डिलिव्हरेबल डेरिव्हेटिव्हज बाजार विकसित करणे

भारतातील आयबीयु अर्थात आयएफएससी बँकिंग युनिट्स असलेल्या बँकांना यापूर्वी अनिवासी भारतीयांशी तसेच आयबीयु असलेल्या इतर पात्र बँकांशी एनडीडीसीज नॉन-डिलिव्हरेबल परकीय चलन विनिमय डेरिव्हेटिव्हज सौद्यांचे व्यवहार भारतीय चलनात करण्याची परवानगी देण्यात आली होती.

आता आयबीयु असलेल्या बँकांना देशातील बाजारात, निवासी ग्राहकांशी भारतीय चलनातील एनडीडीसीजचे व्यवहार करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

नियामकीय प्रक्रियांमधील कार्यक्षमता वाढवणे

रिझर्व्ह बँकेकडून परवाना किंवा अधिकृतता मिळवण्यासाठी अर्ज करण्यास संस्थांना सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘प्रवाह’ हा नियामकीय अर्ज, प्रमाणीकरण आणि कायदेशीर परवानगी मिळवण्यासाठीचा मंच कार्यान्वित करण्यात येणार असून हे एक सुरक्षित वेब आधारित केंद्रीकृत पोर्टल असेल.

वर्ष 2023-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेच्या बरहुकूम स्थापन केलेले हे पोर्टल सध्याच्या यंत्रणेला अधिक सोपे आणि सुव्यवस्थित स्वरूप देईल आणि या पोर्टलच्या माध्यमातून ऑफलाईन तसेच ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने परवान्यासाठीचे अर्ज करणे शक्य होईल.

दावा नसलेल्या ठेवी शोधण्यासाठी लोकांकरता केंद्रीकृत वेब पोर्टल विकासित करणे

सध्या 10 वर्षे किंवा त्याहून अधिक मुदतीच्या दावा न केलेल्या बँक ठेवींचे ठेवीदार किंवा लाभार्थींना अशा ठेवी शोधण्यासाठी अनेक बँकांच्या संकेतस्थळावर जावे लागते असे गव्हर्नरांनी नमूद केले.

आता, अशा दावा न केलेल्या ठेवींची माहिती ठेवीदार/लाभार्थींना सहज आणि तपशीलाने मिळावी  याकरता, संभाव्य दावा न केलेल्या ठेवींसाठी अनेक बँकांमध्ये शोध घेता येईल असे वेब पोर्टल विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  यामुळे ठेवीदार/लाभार्थींना दावा नसलेल्या ठेवी परत मिळण्यास मदत होईल, असे गव्हर्नर म्हणाले.

पत संस्थांद्वारे कर्ज माहिती अहवाल आणि कर्ज माहिती कंपन्यांद्वारे प्रदान केलेल्या कर्ज माहितीशी संबंधित तक्रार निवारण यंत्रणा

कर्ज माहिती कंपन्या (सीआयसी) नुकत्याच रिझर्व्ह बँकेच्या एकात्मिक लोकपाल योजनेच्या (आरबी-आयओएस) कार्यक्षेत्रात, आणल्याची आठवण करुन देत पुढील उपाययोजना जाहीर केल्या:

  1. कर्ज माहिती अहवालाच्या विलंबित अद्ययावतीकरण / दुरुस्तीसाठी भरपाई यंत्रणा
  2. ग्राहकांच्या कर्ज माहिती अहवालात प्रवेश केला जातो तेव्हा त्यांना एसएमएस/ईमेल सूचना देण्याची तरतूद
  3. पत संस्थांकडून सीआयसी द्वारे प्राप्त माहिती-आकडेवारी समाविष्ट करण्यासाठी कालमर्यादा
  4. सीआयसी द्वारे प्राप्त झालेल्या ग्राहकांच्या तक्रारींवरील स्पष्टीकरण

या उपाययोजनांमुळे ग्राहकांचे संरक्षण आणखी वाढेल, असे गव्हर्नर म्हणाले.

युपीआयद्वारे बँकांमधील पूर्व-मंजूर कर्जाचे (क्रेडिट लाइनचे) कार्य

आता युपीआयद्वारे बँकांमध्ये पूर्व-मंजूर कर्जाच्या (क्रेडिट लाइन्सच्या) कार्यान्वयनाला परवानगी देऊन युपीआय ची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी घोषणा गव्हर्नरांनी केली. या उपक्रमामुळे नवोन्मेषाला आणखी प्रोत्साहन मिळेल, असेही ते म्हणाले.

“चलनफुगवठ्याविरुद्ध लढाई सुरूच ठेवली पाहिजे”

चलनफुगवठ्याविरुद्ध लढा अद्याप संपलेला नाही. “आपले काम अजून संपलेले नाही आणि जोपर्यंत चलनफुगवठ्यात स्पष्ट घट होतानाचे लक्ष्य दिसत नाही तोपर्यंत चलनफुगवठ्याविरुद्ध युद्ध सुरूच ठेवावे लागेल.” असे गव्हर्नर म्हणाले.

भारतीय रुपयाची स्थिती वर्ष 2022 मध्ये सुव्यवस्थित होती आणि 2023 मध्येही ती तशीच राहील अशी माहिती गव्हर्नरांनी दिली.

आपल्या बाह्य क्षेत्रातील निर्देशकांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे, असे गव्हर्नर म्हणाले. परकिय चलनसाठ्यात वाढ झाली आहे. 21 ऑक्टोबर 2022 ला तो 524 अब्ज अमेरिकी डॉलर्स होता. आता अग्रिम मालमत्तेचा विचार करता 600 अब्ज अमेरिकी डॉलर्सवर पोहचलाय असे त्यांनी सांगितले.

“आपण किमती स्थिर राखण्याच्या प्रयत्नाबाबत ठाम आणि दृढ आहोत”

संपूर्ण जग 2020 च्या सुरुवातीपासून अत्यंत अनिश्चिततेच्या परिस्थितीतून जात आहे;  मात्र, या आव्हानात्मक वातावरणात, भारताचे आर्थिक क्षेत्र लवचिक आणि स्थिर आहे.  यामुळे चलनविषयक धोरण अटळपणे चलनफुगवठ्याच्या मुद्यावर केंद्रित राहू शकते. या पार्श्वभूमीवर शाश्वत वाढीसाठी सर्वोत्तम हमी असणाऱ्या किमती स्थिर राखण्याच्या प्रयत्नाबाबत  आम्ही ठाम  आणि दृढ आहोत असे गव्हर्नरांनी समारोप करताना अधोरेखित केले. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....